RBI Report : 'कृषी'चं भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा; आरबीआयच्या अहवालात उघड

Employment Growth Report : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकताच देशातील रोजगार वाढीचा अहवाल प्रसिद्ध केला. कोरोनाच्या काळात देशातील रोजगाराला तारण्यात कृषी क्षेत्राने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे या अहवालात म्हटलं आहे.
RBI Report
RBI ReportAgrowon
Published on
Updated on

Pune News : भारताला जगातील अव्वल अर्थव्यवस्था करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. याच दृष्टीने सध्या वाटचाल सुरू असून कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे अनेक अर्थ तज्ज्ञांचे मत आहे. याचदरम्यान देशातील अग्रगन्य असणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यात कोरोना काळाचा उल्लेख करण्यात आला असून देशातील रोजगाराला कृषी क्षेत्राचे तारल्याचे म्हटलं आहे.

आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या अहवालात कोरोनाच्या काळात भारताची लाज वाचवण्यात कृषी क्षेत्राने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे म्हटले आहे. तर कोरोनाच्या काळात भारताने धान्य निर्यात करून आपली अर्थव्यवस्था मजबूत केल्याचेही या अहवालात म्हटले आहे. तसेच या अहवालात कोरोनाच्या काळात म्हणजेच २०२०-२१ मध्ये रोजगार निर्मितीमध्ये कृषी क्षेत्र अव्वल स्थानावर राहिले आहे. तर कोरोना काळात रोजगार निर्मितीत कृषी आणि कृषीशी संबंधित क्षेत्र, आरोग्य आणि सामाजकल्याण विभागामुळे झाल्याचेही आरबीआयने म्हटले आहे.

RBI Report
Rbi Dividend : RBI कडून सरकारला मिळणाऱ्या लाभांशात ३ पट वाढ ; ८७ हजार ४१६ कोटी रुपये तिजोरीत येणार

द टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरबीआयने कोरोनाच्या काळातील रोजगार निर्मितीच्या संदर्भात २७ क्षेत्रांच्या उत्पादकतेचे मूल्यांकन केले आहे. ज्यावेळी देशाच्या जीडीपीमध्ये सातत्याने घट होत होती. तसेच सेवा क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्र ठप्प झाले होते. याचकाळात कृषी आणि कृषी क्षेत्राशी निगडीत क्षेत्रात १८.५ दशलक्ष रोजगार निर्मिती झाली. म्हणजेच देशातील १.८ कोटी लोकांच्या रोजगारात कृषी क्षेत्राने वाढ केली. जी इतर क्षेत्रांपेक्षा सर्वाधिक आहे. तर ही वाढ ४ टक्क्यांच्या घरात आहे. तर एकूण सकल मुल्य वाढ ४.१ टक्क्यांनी घसरल्याचेही आरबीआयचे म्हणणे आहे. याच काळात बांधकाम क्षेत्रात ४.८ दशलक्ष नोकऱ्या वाढल्या.

तसेच आरोग्यसेवेच्या मागणीतही वाढ झाल्याने या क्षेत्रातील रोजगारात १.३ कोटी झाला. केंद्रित उत्पादनामध्ये रोजगाराची वाढ जवळपास १ कोटी होती. याउलट, १.२ कोटी शिक्षणात सर्वात मोठी घसरण झाल्याचे अहवालात म्हटले आहे. २०२१-२२ दरम्यान, उत्पादन क्षेत्रातील रोजगार ४.१ दशलक्षने वाढला. कापड, चामडे आणि पादत्राणे, धातू आणि धातू उत्पादनांमध्ये वाढ नोंदवली गेली. हॉटेल आणि रेस्टॉरंट्स सारख्या क्षेत्रातही ०.६ कोटींची वाढ झाली. तर व्यवसायिक क्षेत्रातही २.२ कोटी नोकऱ्या वाढल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

RBI Report
RBI Repo rate: रिझर्व्ह बॅंकेकडून सलग सहाव्यांदा व्याजदरात वाढ; गृहकर्ज, वाहनकर्ज महागणार

आरबीआयने जारी केलेल्या अहवालात २०२०-२१ मध्ये ३.१ कोटी, २०२१-२२ मध्ये १.२ कोटी आणि २०२२-२३ मध्ये १.९ कोटी लोक रोजगाराशी जोडल्याचे म्हटले आहे. तर कोविडच्या आधी २०२९-२० मध्ये हा आकडा ४.२ कोटी होता असे देशाचे माजी मुख्य सांख्यिकीशास्त्रज्ज्ञ प्रणव सेन यांचे म्हणणे आहे. तसेच कोरोनाच्या काळात शेतीतून रोजगार वाढण्याचे प्रमुख कारण शहरातून खेड्याकडे झालेले स्थलांतर असल्याचे तज्ज्ञ मानतात. याच काळात अनेकांनी शेतीसह शेतीशी संबंधित स्वयंरोजगार केला. त्यामुळे कोरोनाच्या काळात शेतीतून रोजगार वाढल्याचे अहवालातून समोर आले आहे.

कोरोनाची तीव्रता २०२०-२१ मध्ये पहिल्या तिमाहीत २३.१ टक्के आणि त्याच वर्षाच्या दुसऱ्या तिमाहित ५.८ विक्रमी आकुंचनसह वाढ खाली खेचल्याचे समोर आले आह. मात्र यानंतर यात वाढ नोंदवण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ४.७ कोटी लोक रोजगाराशी जोडले गेले आहेत. तर २०२३-२४ मध्ये रोजगार वाढीचा दर ६ टक्के असेल असा अंदाज तज्ज्ञांचा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com