Banana Export: आखाती देशातील युद्धविरामाने केळी निर्यात सुरू

Banana Price: नांदेड जिल्ह्यातून आखाती देशांत केळीची निर्यात सुरळीत झाली आहे. मागील महिन्यापूर्वी केळीला ११०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता.
Banana Export
Banana ExportAgrowon
Published on
Updated on

Nanded News: नांदेड जिल्ह्यातून आखाती देशांत केळीची निर्यात सुरळीत झाली आहे. मागील महिन्यापूर्वी केळीला ११०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. आता मात्र २५०० ते २५५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. या युद्धाचा थेट परिणाम जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर झाला होता.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, नांदेड, भोकर हे तालुके केळी पिकासाठी प्रसिद्ध आहेत. येथील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा केळी हे पीक आहे. मात्र या वर्षी वादळी वाऱ्यामुळे केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना केळीला चांगल्या दराची अपेक्षा होता. परंतु इराण आणि इस्राईल या आखाती देशांत सुरू झालेल्या युद्धामुळे या देशांत जाणारी केळी निर्यात थांबली होती.

Banana Export
Banana Export: अकोल्यातून २० टन केळी इराणला रवाना

यामुळे केळीचे दर गडगडले होते. बाहेर देशात निर्यात थांबल्यामुळे केळीला कवडीमोल दर मिळू लागले होते. लाखो रुपये खर्च केलेल्या केळीला कमी दर मिळत असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र इराण-इस्राईल या दोन देशांतील युद्धविराम झाल्याने केळी निर्यात होण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. यामुळे पहिला चांगला दर मिळत आहे. निर्यातीच्या केळीला २५०० ते २५५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळू लागला आहे.

Banana Export
Banana Farming: खानदेशात मृग बहर केळी लागवड वाढण्याचे संकेत

तर भारतातील अन्य राज्यांत जाणाऱ्या केळीला २००० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. तसेच लोकलमध्ये विकल्या जाणाऱ्या केळीला १७०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. शेतकऱ्यांना कमीत कमी २ हजार ते २५०० रुपये प्रतिक्विंटल हा भाव परवडणारा आहे. अन्यथा कमी दरात केळी परवडणारी नाही.

साता समुद्रापार केळीची निर्यात होण्यास सुरुवात झाली आहे. इराण, इराक, ओमान आदी देशांत निर्यात सुरू झाली आहे. यंदा अर्धापूर, मुदखेड तालुक्यांत मोठ्या प्रमाणात केळीची लागवड झाली आहे. येथील केळी आकाराने मोठी, लांब आणि चवीला गोड आहेत. गुणवत्तापूर्ण असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदेशांत मागणी आहे. निर्यातीच्या केळीला २५०० ते २५५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे, तर दिल्ली, हरियाना, पंजाब, चंडीगड, श्रीनगर येथे पाठवल्या जाणाऱ्या केळीला २००० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com