Annual Toll Pass: बिगर व्यावसायिक वाहनांच्या पथकरासाठी आता वार्षिक पास

Nitin Gadkari Announcement: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारितील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गैरव्यावसायिक वाहनधारकांना मोठा दिलासा देत टोलनाक्‍यासाठी फास्टटॅग आधारित तीन हजार रुपयांची वार्षिक पास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari
Union Minister for Road Transport and Highways Nitin GadkariAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारितील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गैरव्यावसायिक वाहनधारकांना मोठा दिलासा देत टोलनाक्‍यासाठी फास्टटॅग आधारित तीन हजार रुपयांची वार्षिक पास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टपासून राजमार्ग यात्रा ॲप तसेच ‘एनएचएआय’च्या संकेतस्थळावर त्यासाठी खास लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे.

६० किलोमीटर अंतरावरील पथकर नाके आणि त्या संदर्भातील अडचणी आणि त्या पार्श्‍वभूमीवर तक्रारींमध्ये देखील वाढ झाली होती. अशा रहिवासी भागातील नागरिकांना टोलपोटी मोठी रक्‍कम चुकवावी लागत होती. त्यासोबतच वर्षभरात एक किंवा दोन वेळ प्रवास करावा लागतो. म्हणून अनेकजण फास्टटॅगचा वापर न करता रोखीने टोलटॅक्‍सचा भरणा करीत होते. यामुळे टोलनाक्‍यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या.

Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari
Nitin Gadkari : सिंचन, कापूस दराअभावी शेतकरी आत्महत्या

त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टटॅग आधारित तीन हजार रुपयांची वार्षिक पास उपलब्धत करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या पासमुळे टोल भरणे सोपे होणार असून प्रवास सुद्धा सुलभ होईल, असा दावा केला जात आहे. टोल नाक्‍यावर वाद टाळण्यास देखील ही पास साहाय्यभूत होईल, असा विश्‍वास श्री. गडकरी यांनी व्यक्‍त केला आहे.

Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari
Agriculture Innovation: पुणे, नागपूर, सोलापुरात शुद्ध लागवड सामग्री केंद्रे होणार

एक वर्ष किंवा २०० प्रवासापर्यंत वैध

फास्टटॅग आधारित या पासची किंमत तीन हजार रुपये राहणार आहे. या पासची वैधता २०० प्रवास किंवा एक वर्ष यातील जे आधी होईल, त्यानुसार राहील. त्यानंतर या पासचे राजमार्ग ॲप किंवा ‘एनएचएआय’च्या संकेतस्थळावर नूतनीकरण करावे लागणार आहे.

एक टोल नाका पार केल्यास त्याला एक प्रवास असे मानले जाणार आहे. त्याआधारे २०० प्रवास मोजले जातील, अशी माहिती देखील श्री. गडकरी यांच्या वतीने देण्यात आली. कार, जीप, व्हॅन अशा बिगर व्यावसायिक वाहनांकरिता याचा उपयोग होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com