Suraj Chavhan Resign: राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची हकालपट्टी

Latur Political Violence: लातूर येथे रविवारी (ता. २०) पत्रकार परिषदेदरम्यान छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला.
Ajit Pawar and Suraj Chavhan
Ajit Pawar and Suraj ChavhanAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: लातूर येथे रविवारी (ता. २०) पत्रकार परिषदेदरम्यान छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चव्हाण यांना असे वर्तन खपवून घेणार नसल्याचे सांगत राजीनामा देण्याचे आदेश दिले.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधान परिषदेच्या सभागृहात मोबाईलवर जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर लातूर दौऱ्यावर असलेल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देत पत्ते टेबलावर टाकण्याचा प्रयत्न केला. यानंतर कार्यकर्त्यांना बाजूच्या खोलीत नेत सूरज चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर चोहोबाजूंनी टीका होत होती.

Ajit Pawar and Suraj Chavhan
Minister Kokate Rummy : कृषिमंत्री रमी प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पहिला दणका; अजित पवारांनी घेतला कठोर निर्णय

त्यानंतर सोमवारी (ता. २१) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजमाध्यमावर सूरज चव्हाण यांच्यावर कारवाईची माहिती दिली. त्यानुसार, ‘‘काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर व निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे.’’ अशी माहिती श्री. पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

दरम्यान सुनील तटकरे यांनीही या बाबत मत व्यक्त केले असून पक्षांच्या अध्यक्षांनी सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्यास सांगितला आहे. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला आहे, असे पत्रकारांना सांगितले. मारहाणप्रकरणी लातूर येथे सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. चव्हाण यांना अटक होण्याची शक्यता असून पोलिसांचे एक पथक त्यांच्या शोधासाठी तैनात केले आहे.

Ajit Pawar and Suraj Chavhan
Manikrao Kokate Viral Video : राज्यातील शेतकऱ्यांनो, विसरा हमी, खेळा रमी

चव्हाण यांची माफी

छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे पाटील यांना केलेल्या मारहाणप्रकरणी सूरज चव्हाण यांनी माफी मागितली आहे. पक्षनेतृत्वावर अलीकडच्या काळात हीन पातळीवर टीका केली जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत संताप होता. छावा संघटना ही अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे त्यामुळे आम्हाला ती बंधुसंघटना वाटते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देणे किंवा त्यांच्या अंगावर पत्त्याची पाने भिरकावणे हे आम्ही समजू शकतो. पण तेथून निघताना आमच्या नेत्यांबद्दल घाणेरडे उल्लेख केले. ते ऐकून कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे मारहाणीचा प्रकार घडला. अर्थात तो घडायला नको होता, असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली.

लातूरमध्ये कडकडीत बंद

अखिल भारतीय छावा युवक संघटनेच्या शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना रात्री राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण व कार्यकर्त्यांना केलेल्या बेदम मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी (ता. २१) पुकारण्यात आलेल्या सर्वपक्षीय लातूर बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातही या घटनेचे पडसाद उमटले. रविवारी रात्रीच लातूर बंदची हाक देण्यात आली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com