Manikrao Kokate Viral Video : राज्यातील शेतकऱ्यांनो, विसरा हमी, खेळा रमी

Agriculture Minister Controversy : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेतील ‘जंगली रमी’ खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कोकाटे यांच्यासह सरकारवर टीकेची झोड उठत आहे.
Manikrao Kokate Viral Video
Manikrao Kokate Viral VideoAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेतील ‘जंगली रमी’ खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कोकाटे यांच्यासह सरकारवर टीकेची झोड उठत आहे. कोकाटे हे सभागृहात बसले असताना ते जंगली रमी गेम खेळत होते. त्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस रोहित पवार यांनी समाजमाध्यमावर अपलोड केला.

कोकाटे यांच्या या कृतीवर विरोधकांनी सडकून टीका केली असून, शिवसेनेचे संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य करताना ‘भाजपने ज्या पाच, सहा मंत्र्यांची हकालपट्टी करण्यासाठी नावांची यादी दिली आहे, त्यात माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे’ असा गौप्यस्फोट केला.

दरम्यान, मी विधान परिषदेत बसल्यानंतर कामकाज संपले होते. त्यानंतर विधानसभेत काय कामकाज चालले आहे हे पाहण्यासाठी यू-ट्यूब सुरू केले. त्या वेळी आलेली जहिरात पुढे ढकलत होतो. त्याचा हा व्हिडिओ असल्याचे स्पष्टीकरण माणिकराव कोकाटे यांनी दिले आहे. शुक्रवारी (ता. १८) विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपले असले, तरी त्याचे कवित्व अजूनही सुरू आहे.

Manikrao Kokate Viral Video
Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री राजीनामा द्या!

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील उपहारगृहात कर्मचाऱ्याला केलेली मारहाण, गोपीचंद पडळकर यांच्या सहकाऱ्याने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला केलेली मारहाण आणि अन्य कारणांनी या अधिवेशनात सत्ताधारी गटाला रोषाला सामोरे जावे लागले. या प्रकरणी गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, तर पडळकर यांना सभागृहात माफी मागण्याची नामुष्की पत्करावी लागली.

दरम्यान, कृषिमंत्री कोकाटे यांनी पहिल्या आठवड्यात अपवाद वगळता कामकाजाकडे पाठ फिरविली. विधानसभेतील प्रस्तावांना कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनीच उत्तर दिले. सभागृहातील कामकाजादरम्यान त्यांनी मंत्रालयात बैठका घेणे पसंद केले. तसेच शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्ये केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठविली होती.

रविवारी (ता. २०) सकाळी रोहित पवार यांनी समाजमाध्यमावर कोकाटे यांचा जंगली रमी खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. रोहित पवार यांनी समाजमाध्यमावर ‘सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही.

त्यामुळे शेतीचे असंख्य प्रश्‍न प्रलंबित असताना राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असतानासुद्धा काहीच काम नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीकविमा, कर्जमाफी, भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्त हाक ऐकू येत नाही.’ असे म्हणत खेळ थांबवा कर्जमाफी द्या, अशी मागणी केली आहे.

Manikrao Kokate Viral Video
Manikrao Kokate Controversy : शेतकरी पुत्र आहात, जबाबदारीने बोला

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘शेतकऱ्यांनो, विसरा हमी, खेळा रमी’, असे म्हणत उपरोधिक टीका केली आहे. तर दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असताना यांना लाज कशी वाटत नाही, अशी कडवट टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. बच्चू कडू यांनीही टीका केली असून, कृषिमंत्र्यांची ही आठवी-नववी चूक आहे.

त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? तेच जर रमी खेळत असतील तर आमच्या शेतकऱ्यांचे काय भले होणार, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी कृषिमंत्री रमी खेळताहेत, त्यामुळे या सरकारला शेतकऱ्यांशी देणेघेणे नाही, यांना शेतकऱ्यांनीच धडा शिकवला पाहिजे, असे आवाहन केले.

धोरणांवर टीका करून दाखवावी

मी रमी खेळत नव्हतो. मी विधान परिषदेत होतो. सभागृहाचे कामकाज स्थगित झाल्यामुळे विधानसभेत काय कामकाज सुरू आहे हे यू-ट्यूबवर बघत होतो. ते बघताना अचानक जंगली रमीची जाहिरात आली. ती स्कीप करत होतो.

ते करताना काही सेकंद वेळ लागला. तेवढीच क्लीप वायरल करण्यात आली. पूर्ण व्हिडिओ बघितला तर वस्तुस्थिती कळेल, असा खुलासा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव काकाटे यांनी केला. विरोधक माझ्या कपड्यांवरून, गाडीवरून टीका करतात. त्याऐवजी धोरणांवर टीका करून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com