Ambajogai KVK: अंबाजोगाई केव्हीकेमध्ये ‘किसान गोष्टी’

Sustainable Agriculture: दीनदयाल शोध संस्थान, अंबाजोगाई कृषी विज्ञान केंद्र, तालुका कृषी अधिकारी कार्यालय व आत्मा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. २) ‘किसान गोष्टी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Ambajogai KVK
Ambajogai KVKAgrowon
Published on
Updated on

Beed News: दीनदयाल शोध संस्थान, अंबाजोगाई कृषी विज्ञान केंद्र, तालुका कृषी अधिकारी कार्यालय व आत्मा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. २) ‘किसान गोष्टी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला आमदार नमिता मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी उपसंचालक दादाराव जाधवर, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ-प्रमुख डॉ. वसंत देशमुख व वैज्ञानिक सल्लागार समिती सदस्य हिंदुलाल काकडे यांची मंचावर उपस्थिती होती. तालुका कृषी अधिकारी रवी मुंडे यांनी प्रास्ताविक केले.

Ambajogai KVK
Agriculture Technology : तंत्रज्ञान प्रसारात अग्रेसर अंबाजोगाईचे केव्हीके

ऑनलाइन माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. आमदार मुंदडा म्हणाल्या, की शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग व आत्मा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले जात आहेत.

विविध डिजिटल समाजमाध्यमांचा विधायक वापर करून आधुनिक व शाश्वत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या घरात व बांधावर पोचविले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासन शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.

Ambajogai KVK
Ambajogai APMC News: अंबाजोगाई बाजार समितीच्या सभापतिपदी ॲड. राजेश्‍वर चव्हाण

पीकविद्या शास्त्रज्ञ कृष्णा कर्डिले यांनी, खरीप हंगामातील पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले तर डॉ. प्रदीप सांगळे यांनी, कीड व रोग नियंत्रणाबाबत शास्त्रीय माहिती दिली. राज्य कृषी विभागाचे सांख्यिकी तंत्र अधिकारी बीड हर्षवर्धन खेडकर यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले.

सहायक कृषी अधिकारी बालाजी केसरे, एस. आर. अरसुळे, बी. एम. माचवे यांनी पोकरा प्रकल्प, एमआरइजीएस उपक्रम व गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांना केव्हीकेद्वारे प्रकाशित शेतकरी यशोगाथा पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

तसेच शासकीय योजना, भूमी-सुपोषण, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि कृषीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या विषयांवरील विस्तार फोल्डरचेही वाटप करण्यात आले. अंबाजोगाई, केज, परळी व धारूर तालुक्यातील २०० पेक्षा जास्त शेतकरी (पुरुष व महिला) तसेच कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. संयोजन व संचालन कृषी विस्तार शास्त्रज्ञ सुहास पंके यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com