Agriculture Technology : तंत्रज्ञान प्रसारात अग्रेसर अंबाजोगाईचे केव्हीके

Horticultural Technology : शेती. पूरक, प्रक्रिया, जलसंधारण, यंत्रे आणि ‘मार्केट लिंकेज’ पर्यंत कोरडवाहूसह बागायती पध्दतीचे तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. सुमारे वीसहजार शेतकरी केव्हीकेसोबत जोडले आहेत.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

Agriculture Research in KVK : भारतरत्न नानाजी देशमुख यांनी दीनदयाल शोध संस्थान या संस्थेची स्थापना केली. त्याअंतर्गत १९९२ पासून अंबाजोगाई येथे कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) कार्यान्वित झाले. केंद्राकडे तज्ज्ञ व अनुभवी शास्त्रज्ञांची उपलब्धता आहे. त्या माध्यमातून कृषी विद्यापीठे, राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थांद्वारे विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यात येते.

अंबाजोगाई केव्हीके दृष्टीक्षेपात

वर्षाला सुमारे आठ हजार शेतकरी येथे भेटी देतात.

सुमारे ११५ ते १२० गावांमधून १८ ते २० हजार शेतकऱ्यांशी केव्हीके जोडले आहे.

बीड जिल्ह्यासह शेजारच्या लातूर व धाराशिव जिल्ह्याचाही समावेश.

केंद्राची शेतजमीन ५५ एकर.

केव्हीकेचे निवडक उपक्रम

पीकपद्धती

अल्पभूधारक शेतकऱ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता एकात्मिक शेती पद्धतीची प्रात्यक्षिके केंद्राच्या व शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर घेण्यात येतात. सुमारे ५५ शेतकऱ्यांकडून या पध्दतीचा अवलंब.

हवामान अनुकूल शेतीसाठी क्रिडा, हैदराबाद या संस्थेच्या मदतीने अंबाजोगाई तालुक्‍यातील राजेवाडी गावात दोन वर्षापासून प्रकल्प. यात रुंद वरंबा-सरी, जमिनीची बांध बंदिस्ती, बोअरवेल पुनर्भरण, हवामान अनुकूल पीक वाणांची लागवड, बांधावर फळझाड व बांबू लागवड, सुधारित अवजारांचा वापर, पाण्याचा ताण व्यवस्थापन आदी प्रात्यक्षिके.

यंदा २८ गावांतील १३० शेतकऱ्यांकडे तीनशे एकरांवर सघन कापूस लागवड प्रात्यक्षिके. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व खासगी बियाणे कंपन्यांचे त्यास सहकार्य.

सोयाबीन, तूर, मूग, हरभरा व करडई आदींचे बीजोत्पादन व विक्री. १२० शेतकऱ्यांकडे नैसर्गिक शेती प्रात्यक्षिके. तीनशे शेतकऱ्यांना ‘आत्मा’ अंतर्गत प्रशिक्षण. लातूर येथील कंपनीसोबत ‘मार्केट लिंकेज’ करून देण्याचा प्रयत्न.

Agriculture Technology
Horticultural Development : ‘फलोत्पादन विकास’अंतर्गत जुन्या बागांचे पुनरुज्जीवन योजना

रोपवाटिका

फळे, भाजीपाला फुले, औषधी व शोभेच्या वनस्पतींची रोपे- कलमे यांची निर्मिती.

आंबा (१२ जाती), पेरू (सरदार), डाळिंब (भगवा), आवळा (एन ७, एन १०, चकय्या, कांचन), बोर (गोल, कडाका, उमराण, चमेली), सीताफळ (धारूर ६), चिकू (कालीपत्ती) आदींची दर्जेदार कलमे माफक दरात मिळतात.

मातृवृक्ष बागेचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन १० एकरांवर.

प्रयोगशाळा

सुसज्ज प्रयोगशाळेच्या माध्यमातून वर्षाला प्रत्येकी चारहजार माती व पाणी नमुन्यांचे पृथ्थकरण व ''मृदा आरोग्य पत्रिका'' वितरित. जिवाणू संवर्धके व कृषी विद्यापीठांकडील जैविक निविष्ठांची उपलब्धता.

प्रक्रिया

प्रत्येक तालुक्‍यातून दहा गावांतील निवडक शेतकऱ्यांना एकत्र करून केव्हीकेकडून सहा शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंद.

अंबाजोगाई तालुक्‍यातील मांडवा (पठाण) गावातील सुमारे १०० ऊसतोड महिलांना बाजरी खारवडी उत्पादन व विक्री प्रशिक्षण. दहा महिलांनी उद्योग सुरू केला. त्यातून उदरनिर्वाहासाठी त्यांचे स्थलांतर थांबले.

प्रक्रिया प्रशिक्षणातून ५४ महिलांनी उद्योग सुरू केले. यात घरगुती मसाले, आवळा प्रक्रिया उत्पादने, ज्वारी-बाजरी प्रक्रिया,गो-आधारित उत्पादने, फळे-भाजीपाला प्रक्रिया, कपडे शिलाई, ब्युटी पार्लर, शोभेच्या वस्तू निर्मिती आदींचा समावेश.

केव्हीकेचीही काही उत्पादने आहेत. यात आवळा कॅण्डी, मुरंबा, जवस मुखवास, बाजरी खारवडी, मिलेट मिक्‍स, मल्टीग्रेन आटा, शेवगा पावडर, काळा मसाला, लाकडी घाणा तेल, वाळलेला कांदा, मूग- तूर डाळ आदींचा समावेश. त्यासाठी ''ग्रामोदय'' ब्रॅण्ड. मध उत्पादकांकडील मधाची वर्षाकाठी ७०० किलोपर्यंत विक्री.

तांत्रिक उपक्रम

आयआयटी मुंबई व जलवर्धिनी प्रतिष्ठान पुणे यांच्या मदतीने पाच तालुक्‍यांतील ११ गावांतून १८ अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे १० हजार लिटर क्षमतेचे ‘फार्मपॉंड’ बांधले. हौदाला बळकटी देण्यासाठी नारळ काथ्या (नैसर्गिक तंतू) व फेरोसिमेंट यांचा वापर. त्यातून निकडीच्या काळात संरक्षित सिंचन करणे शक्य झाले.

पाच गावांत नाला खोली- रुंदीकरणाचे ७.२२ किलोमीटर काम. त्यातून नाल्याच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांना ६९ हजार घनमीटर पाणी साठवण क्षमतेचा लाभ.

बैलचलित, ट्रॅक्‍टरचलित सुमारे १७ प्रकारच्या अवजारांची उपलब्धता. भाडेतत्त्वावर शेतकऱ्यांना सेवा.

Agriculture Technology
Horticulture Subsidy : ड्रॅगन फ्रूट, अॅवोकॅडोपिकांसह हरितगृह, शेडनेट, पॅकहाउसला मिळणार अनुदान

कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र

केंद्रातर्फे मेळावे, कृषी प्रदर्शनात सहभाग, प्रक्षेत्र दिवस.

‘किसान सारथी पोर्टल’च्या माध्यमातून जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी डिजिटल पद्धतीने केंद्राशी जोडले.

मोबाईलच्या माध्यमातून कृषी सल्ला प्रत्येक गावातील सरासरी २६० शेतकऱ्यांपर्यंत पोचतो.

टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून शेतकरी केंद्रातील शास्त्रज्ञांची संवाद साधू शकतात. महत्त्वाच्या विषयांवर घडीपत्रिका, पोस्टर, पुस्तिका प्रकाशने केंद्रातर्फे उपलब्ध.

पूरक प्रकल्प

स्थानिक पशुवंश संवर्धन, मुक्त संचार गोठा पद्धती, बंदिस्त उस्मानाबादी शेळीपालन, चारा पिके प्रात्यक्षिके व उत्पादन प्रक्षेत्र, गांडूळ खतनिर्मिती, सुधारित कुक्कुटपालन व पक्षी पुरवठा, अझोला खाद्य उत्पादन.

गौरव

आयसीएआर तर्फे उत्कृष्ट कृषी विस्तार कार्यासाठी केंद्राला ''पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय विज्ञान प्रोत्साहन पुरस्कार (२०२०)

केंद्राशी संलग्न शेतकऱ्यांनाही पुरस्कार. यात जगजीवन राम नवोन्मेशी शेतकरी पुरस्कार, सेंद्रिय शेतीसाठी जिजामाता कृषिभूषण, उद्यान पंडित, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, ॲग्रोवन स्मार्ट व युवा शेतकरी आदी २३ शेतकऱ्यांचा समावेश.

डॉ. वसंत देशमुख, ८९५६२३८९५५ (कार्यक्रम समन्वयक)

सुहास पंके, ९९२३९९१५५१ (कृषी विस्तार तज्ज्ञ)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com