Agriculture Department : कृषी उपसंचालक संजय गुंजाळ लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

Anti-corruption Squad Arrests : कृषी आयुक्तालयातील फलोत्पादन विभागातील उपसंचालक संजय गुंजाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी (ता.१०) ताब्यात घेतले.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Pune News : कृषी आयुक्तालयातील फलोत्पादन विभागातील उपसंचालक संजय गुंजाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी (ता.१०) ताब्यात घेतले. गैरव्यवहार प्रकरणात निलंबित केलेल्या कर्मचाऱ्याकडून तीन लाख रुपयांची लाचेची मागणी त्यांनी केली होती. संगमवाडी परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. निलंबित कर्मचाऱ्याकडून अडीच लाख रुपयांची लाच घेताना गुंजाळ यांना ताब्यात घेण्यात आले.

कृषी आयुक्तालयातील फलोत्पादन विभागातील उपसंचालक, प्रभारी सहसंचालक संजय बहादूर गुंजाळ यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये येरवडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत कृषी आयुक्तालयातील निलंबित कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. तक्रारदार २०१९-२०२० मध्ये जळगाव जामोद बुलडाणा येथे कनिष्ठ लिपिक होते.

Agriculture Department
Agriculture Department : पदनाम बदलाबाबत कृषी सहायकांशी सापत्न वागणूक

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत गैरव्यवहार, तसेच कसूर केल्याचा ठपका ठेवून अमरावतीतील कृषी सहसंचालकांनी त्यांना सेवेतून निलंबित केले होते. निलंबन कालावधीत मदत केल्याप्रकरणी चौकशी सुरू होती.

निलंबन कालावधीत मदत करणे, तसेच तक्रारदाराविरुद्ध घेण्यात आलेल्या आक्षेपांविरुद्ध मदत करण्यासाठी गुंजाळ यांनी त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने तडजोडीत अडीच लाख रुपयांची लाच देण्याचे मान्य करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात तक्रार दिली.

Agriculture Department
Agriculture Department : कृषी विभाग, विद्यापीठांच्या कामकाज सुधारणांसाठी दोन समित्या स्थापणार

या तक्रारीची पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पडताळणी केली. तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर सापळा लावण्यात आला. शुक्रवारी रात्री तक्रारदाराला अडीच लाख रुपये घेऊन संगमवाडी येथील खासगी प्रवासी वाहतूक थांब्यावर बोलाविण्यात आले. या वेळी तक्रारदाराकडून लाच घेताना गुंजाळ यांना पकडण्यात आले.

पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनखाली ही कारवाई करण्यात आली. रात्री उशिरा त्यांच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com