Sugarcane Farmer : 'शाश्वत तंत्रज्ञान वापरल्यास एकरी शंभर टन उत्पादन शक्य'

Sugarcane Expert : ऊस विशेषतज्ज्ञ सुरेश माने यांनी शेतकऱ्यांना एकरी १०० टन उसाचे उत्पादन कसे घ्यावे यावर माहिती दिली.
Sugarcane Farmer
Sugarcane Farmeragrowon
Published on
Updated on

Kolhapur Sugarcane Farmer : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात चांगली रिकव्हरी असलेल्या कुंभी-कासारी साखर कारखान्यातर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरिता कुंभी कारखाना कार्यस्थळावर ऊस पीक परिसंवाद ठेवण्यात आला होता.

यावेळी ऊस विशेषतज्ज्ञ सुरेश माने यांनी शेतकऱ्यांना एकरी १०० टन उसाचे उत्पादन कसे घ्यावे यावर माहिती दिली. यावेळी अध्यक्ष चंद्रदीप नरके, उपाध्यक्ष विश्वास पाटील, संचालक उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी उसाचे एकरी शंभर टनाचे उदिष्ट ठेवावे. योग्य वेळी योग्य काम, व्यवस्थापन करून, तंत्रज्ञान वापरून उसाचे भरघोस उत्पन्न घेता येते, असे प्रतिपादन ऊस विशेषतज्ज्ञ सुरेश माने यांनी केले.

तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात चांगल्या दर्जाची माती असल्याने कोणतेही कष्ट न घेता एकरी ४० उत्पादन घेण्याची क्षमता आहे. जर शाश्वत तंत्रज्ञान वापरल्यास एकरी शंभर टन उत्पादन घेणे शक्य असल्याची माहिती माने यांनी दिली. आडसाली हंगामातील नियोजन, पूर्वहंगामी सुरू हंगाम लागणीबाबत मार्गदर्शन केले.

Sugarcane Farmer
Sugarcane Season : अखेर मुहूर्त सापडला ! गळीत हंगाम सुरू करण्याबाबत मंगळवारी मंत्री समितीची बैठक

बियाण्यांबाबत बोलताना ८६०३२, ९२००५ तसेच नवनवीन जातीच्या बियाण्यांची माने यांनी माहिती दिली. बियाणे निवड, मशागत, सरी पद्धत, खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन कसे करावे याबाबतही त्यांनी सांगितलं.

याचबरोबर योग्य वेळेत योग्य काम करून शंभर टनाची शेती करावी तरच ती परवडेल असे सांगून जैविक, सेंद्रिय, रासायनिक अशा एकात्मिक खत व्यवस्थापनातून शेती करावी, अध्यक्ष चंद्रदीप नरके म्हणाले, 'स्वर्गीय डी. सी. नरके यांच्या काळापासून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होत आहेत. कारखान्यातर्फे ऊसविकास योजना राबवल्या जातात.

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने उत्पादनात घटण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी आयोजित ऊस पीक परिसंवादाचा लाभ घेत असल्याचीही माहिती देण्यात आली. शनिवारी (ता. १४) महालक्ष्मी हॉल कसबा बीड, रविवारी (ता. १५) माणिक हॉल कळे येथे पीक परिसंवाद होईल, अशी माहिती अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी दिली.. कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी स्वागत केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com