Dairy Management : आधुनिक पद्धतीने गोठा व्यवस्थापनाच्या यशस्वी प्रवासाची कथा

Cattle Farming : मुक्त गोठा पद्धतीने व्यवसायाची उभारणी करण्याचं निश्‍चित केलं होतं. त्यासाठी प्रशस्त असे कुंपणवजा आणि स्वतंत्र पत्राशेड उभारण्याची गरज होती. सुमारे ५० बाय ३० फूट आकाराच्या शेड उभारणीचे नियोजन झाले खरे.
Success Story
Success StoryAgrowon
Published on
Updated on

Innovative Farming Technique : मुक्त गोठा पद्धतीने व्यवसायाची उभारणी करण्याचं निश्‍चित केलं होतं. त्यासाठी प्रशस्त असे कुंपणवजा आणि स्वतंत्र पत्राशेड उभारण्याची गरज होती. सुमारे ५० बाय ३० फूट आकाराच्या शेड उभारणीचे नियोजन झाले खरे. पण पत्रे, अँगल आदींसाठी खर्च मोठा असून तो परवडणे शक्य नसल्याचे समजले. मग थेट भंगार साहित्य बाजारपेठेत जाऊन आवश्‍यक सामग्रीची खरेदी झाली. त्यातून कमी रकमेत शेड उभारण्यात आले.

नेटक्या व्यवस्थापनामुळे हळूहळू व्यवसायात जम बसू लागला. दुधाच्या गुणवत्तेत सातत्य ठेवले. त्यास दरही चांगला मिळू लागला. चार पैसे जास्तीचे हाती पडून अर्थकारण सुधारू लागले. मग कुटुंबाचा उत्साह व आत्मविश्‍वास चांगलाच वाढला. मग दरवर्षी एक-दोन, तीन असे करत गोठ्यातील गायींची संख्या वाढत गेली. एकेकाळी दोन गायींपासून सुरुवात होत आजमितीला २० एचएफ गायी, १० कालवडी आणि दोन दुभत्या म्हशी असं दुधाचं नंदनवन लेंडवे यांच्या गोठ्यात तयार झालं आहे.

Success Story
Cattle Farming : ‘हिरकणी’ झाली हो...

आधुनिक पद्धतीने गोठा व्यवस्थापन

पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणं परवडण्यासाखं नाही हे बिभीषण यांच्या लक्षात आलं. पेशाने शिक्षक असल्याने अभ्यासूवृत्ती त्यांच्या अंगात भिनली होती. त्यादृष्टीने आधुनिक, तंत्रयुक्त पद्धतीने गोठा व्यवस्थापन करण्यावर भर दिला. विशेषतः दुष्काळी भागात चारा उपलब्धता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो.

अशावेळी खाद्यात शक्य तिथे बचत व काटेकोर वापर करून गायींना आवश्‍यक आहार मिळतो आहे याकडे लक्ष दिले. जास्त, मध्यम ते कमी दूध देणाऱ्या, संक्रमण काळातील अशी गायींची स्वतंत्र वर्गवारी केली. बिभीषण यांनी दुग्ध व्यवसायाचा बारकाईने अभ्यास करताना महाराष्ट्रातील प्रगतिशील दूध उत्पादकांचे गोठे पाहिले. त्यांचे व्यवस्थापन जाणून घेतले. पंजाब राज्यातील लुधियाना भागातील शेतकऱ्यांच्या गोठ्यांनाही भेटी देत त्यांचे तंत्र अभ्यासले.

Success Story
Dairy Farming : जातिवंत, दुधाळ गायींच्या पैदासाचे यश

त्यातूनच त्यांनी अमेरिका, नेदरलॅंड, डेन्मार्क येथील कंपन्यांकडील सीमेन तंत्र (वळू वीर्यमात्रा) वापरण्यास सुरुवात केली. आज याच तंत्राचा वापर करून त्यांच्याकडे जातिवंत वंशावळीच्या कालवडी तयार झाल्या आहेत. त्यातून त्यांची दूध उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. कर्नाटकातील बंगळूर मार्केट गाईंसाठी चांगले आहे असा बिभीषण यांचा अनुभव आहे. त्यामुळे तेथून गायी आणण्याकडे त्यांचा कल आहे. सर्व व्यवस्थापन करताना पाण्याची वेळोवेळी टंचाई देखील भासली. तीन महिने टॅंकरने पाणी देऊन गोठा व्यवस्थापन करावे लागले.

वर्षभराचा मुरघास तयार

गोठ्यातील गायींची संख्या वाढू लागली तसतशी खाद्याचीही अधिक गरज भासू लागली. त्यातून स्वतःकडील काही क्षेत्रावर मका, कडवळ ज्वारी अशी पिके घेऊन आणि बाहेरून वैरण घेऊन मुरघास तयार करण्यास सुरुवात केली. खड्डा पद्धतीने वर्षभर पुरेल असा ३० टन क्षमतेपर्यंत मुरघास आज तयार केला जातो. सोबतच ओल्या चाऱ्याचेही योग्य पद्धतीने नियोजन केले.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com