Dairy Farm Success Story : दुग्ध व्यवसायाच्या मार्गावर तांबिले कुटुंबाचा संघर्ष आणि विजय!

Agriculture Business : गायींची संख्या वाढू लागल्यानंतर या दीड एकरांतील फार्मची मुक्तसंचार पद्धतीने रचना केली. सोबतच मिल्किंग मशिन, बल्क मिल्क कुलर, कडबा कुट्टी यंत्र, कॅन, जनरेटर आदी सामग्री आली.
Tambile Family
Tambile FamilyAgrowon
Published on
Updated on

Dairy Business Success Story :

विकसित झाला डेअरी फार्म

गायींची संख्या वाढू लागल्यानंतर या दीड एकरांतील फार्मची मुक्तसंचार पद्धतीने रचना केली. सोबतच मिल्किंग मशिन, बल्क मिल्क कुलर, कडबा कुट्टी यंत्र, कॅन, जनरेटर आदी सामग्री आली. कामे सुलभ होऊ लागली. गोठ्याच्या मध्यभागी पत्र्याच्या शेडचा निवारा, दोन्ही बाजूंनी पुरेशी मोकळी जागा आहे. त्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश मिळून हवा खेळती राहते. मोकळ्या जागेत पाण्याचे हौद, लोखंडी जाळीचे कुंपण, त्याजवळ वृक्ष लागवड आहे. त्यामुळे सावली मिळून वातावरण थंड राहते. सिमेंट विटांचा वापर करून गव्हाणी तयार केल्या आहेत.

व्यवस्थापन ठेवले काटेकोर

मुक्त संचार गोठा पद्धतीमुळे खर्च कमी झाला. मनुष्यबळ कमी झाले. गायी स्वच्छ, निरोगी राहू लागल्या. त्यांना हव्या त्या वेळी चारा- पाणी घेणे शक्य झाले. कासदाह समस्येचे प्रमाण कमी झाले. औषधोपचारांवरील खर्च कमी झाला. आहार व्यवस्थापन उत्तम ठेवले आहे. संकरित नेपियर गवताची दोन एकरांत तर मक्याची चार- पाच एकरांत लागवड असते. जानेवारीत शंभर टनांपर्यंत मुरघास तयार केला जातो. आजेगाव येथील पशुचिकित्सालयाचे क्षेत्रिय कर्मचारी संतोष बोडके यांच्या मदतीने विविध रोगांसाठी लसीकरण केले जाते.

Tambile Family
Dairy Business : दुग्ध व्यवसायातून साकारला स्वप्नातील बंगला !

कृत्रिम रेतन तसेच जातिवंत वळूचा वापर करून प्रजनन केले जाते. काटेकोर व्यवस्थापनातून स्वच्छ व दर्जेदार दूध निर्मितीला चालना मिळाली आहे. मुक्तसंचार गोठ्याशेजारी घर बांधले आहे. ओट्यावर बल्क मिल्क कुलर यंत्रणा आहे. घरासमोरील मोकळ्या जागेत पशुखाद्य सुविधा व गोदाम आहे. दोन किलोमीटरवरील शेतातील विहिरीवरून पाइपलाइनद्वारे फार्मवर पाणी आणले आहे. दुग्ध व्यवसायाचे मुख्य व्यवस्थापन रुस्तुमराव करतात. शिवाय कुटुंबातील सखूबाई, दुर्गाबाई, शांताबाई आदी महिला सदस्यही घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून व्यवसायात मदत करतात.

दीडशे- दोनशे लिटरपर्यंत रोजचे संकलन

केवळ दोन गायींपासून सुरू केलेल्या दुग्ध व्यवसायाची वाट खडतर, संघर्षमय होती. मात्र चिकाटी, अविश्रांत कष्ट, सातत्य, धाडसीवृत्ती व व्यावसायिक हुशारी यांच्या बळावर गायींची संख्या सव्वाशेपर्यंत नेण्यात तांबिले यशस्वी झाले. रोजचे दूध संकलन चारशे ते पाचशे लिटरपर्यंत गेले. गावातील दूध संकलनही वाढले होते. मात्र दुष्काळी स्थिती, वैरण, पशुखाद्यांचे वाढते दर यामुळे व्यवसाय अधिक खर्चिक होऊ लागला. परभणी येथील शासकीय डेअरीही बंद झाली. त्यानंतर मात्र गायींची संख्या कमी केली. आज लहान-मोठ्या मिळून ६० पर्यंत गायी (एचएफ) व तीन-चार म्हशी आहेत. दिवसाला पंधरा ते पंचवीस लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गायी गोठ्यात आढळतात.

Tambile Family
Dairy Farming : तांबिले बंधूंचा दुग्ध व्यवसायाचा प्रवास

गाईच्या शेणापासून रंगनिर्मिती

रामेश्‍वर यांचे चिरंजीव सचिन यांनी जैवतंत्रज्ञान विषयात एम.एस्सी. केले आहे. त्यांनी जयपूर येथे रीतसर प्रशिक्षण घेऊन शेणावर प्रक्रिया करून त्याच्या द्रवरूप अर्कापासून रंग निर्मिती सुरु केली. ही नक्कीच अभिनव कल्पना आहे. या अर्काचा मुख्य आधार वापरून ‘डिस्टेंपर’, ‘प्रायमर’, ‘इमल्शन’, आदी स्वरूपातील रंगनिर्मिती करता येते. या अर्कप्रक्रियेतून शिल्लक राहिलेल्या अवशेषांपासून वॉलपुट्टी म्हणून वापर होतो.

वाघजाळी येथे तांबिले कुटुंबाने बांधलेल्या नव्या घराला हाच रंग दिला आहे. हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सचिन यांनी रंगनिर्मिती कारखाना सुरू केला आहे. त्यात रोजगारही दिला आहे. या रंगांना विविध ठिकाणी मागणी आहे. त्यासाठी ताज्या शेणाची उपलब्धता वाढावी यासाठी हिंगोली येथे गोठा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.

दोन्ही वेळचे मिळून गायींचे दीडशे ते दोनशे लिटर, तर दोन म्हशीचे पंचवीस लिटरपर्यंत दूध उपलब्ध होते. रिसोड (जि. वाशीम) येथील खासगी डेअरीला बहुतांशी दुधाचा पुरवठा होतो. फॅट व एसएनएफनुसार दुधाला दर मिळतो. गाव परिसरातील काही व्यावसायिकांकडून चाळीस लिटरपर्यंत तर शेजारील कहाकर गावातूनही दहा- वीस लिटर दुधाची चाळीस रुपये प्रति लिटर दराने खरेदी होते.

गाई, कालवडी, गोऱ्ह्यांच्या विक्रीतूनही पूरक उत्पन्न मिळते. अशा रीतीने व्यवसायातून सात- आठ लाख रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत कुटुंबाने मजल गाठली आहे. परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. नितीन मार्कंडेय, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाल्याने व्यवसायात सुधारणा करता आल्या. कृषी विज्ञान केंद्रातील प्रशिक्षणार्थी व शेतकऱ्यांसाठी तांबिले यांचा डेअरी फार्म आता प्रशिक्षणाचे केंद्र झाला आहे.

कुटुंबाचे कारभारी असलेले रामेश्‍वर आज त्यांनीच स्थापन केलेल्या कृष्णाई संस्थेचे चेअरमन आहेत. संस्थेचे पन्नास सभासद आहेत. सध्या प्रति दिन म्हशीचे दोनशे लिटर दूध संकलन होते. अमूल डेअरीला त्याचा पुरवठा होतो. गावातील सामाजिक उपक्रमातही रामेश्‍वर आघाडीवर असतात. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय कृषी महोत्सवात त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे. बंधू श्यामराव देखील शेती सांभाळून सामाजिक, धार्मिक कार्यात सहभागी असतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com