Post Harvest Management: फलोत्पादन अभियानाचा भर आता काढणीपश्‍चात व्यवस्थापनावर

Horticulture Mission: राज्यात यंदा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत १६८ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी ४७ कोटी २४ लाख रुपये काढणीपश्‍चात (पोस्ट हार्वेस्ट) व्यवस्थापनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
Maharashtra Horticulture Development Mission
Maharashtra Integrated Horticulture Development Scheme 2026Agrowon
Published on
Updated on

Horticulture Development Plan: राज्यात यंदा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत १६८ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी ४७ कोटी २४ लाख रुपये काढणीपश्‍चात (पोस्ट हार्वेस्ट) व्यवस्थापनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. फलोत्पादनातील मूल्यवर्धन आणि उत्पादनाचे नुकसान कमी करण्यावर यंदा विशेष भर देण्यात आला आहे.

२००५-०६ मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सुरू झाल्यानंतर राज्यात फळबाग क्षेत्रवाढीस मोठी चालना मिळाली. २०१४ पासून हे अभियान एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान म्हणून अधिक व्यापक करण्यात आले. त्यानंतर २०२४ मध्ये केंद्र सरकारने या अभियानात घटकनिहाय बदल केले असून, त्याची अंमलबजावणी २०२५-२६ पासून सुरू झाली.

Maharashtra Horticulture Development Mission
Horticulture Production: फलोत्पादनाचा उच्चांक

अभियानातील बदलांनंतर राज्यासाठी केंद्राने २५ कोटी रुपयांचा शिल्लक निधी आणि १४६ कोटी रुपयांचा नवीन आराखडा मंजूर केला होता. मात्र, मागील आर्थिक वर्षात मार्चअखेर केवळ १२६ कोटी रुपये खर्च झाले.

Maharashtra Horticulture Development Mission
Horticulture Policy: नव्या धोरणापोटी, ‘फळे’ रसाळ गोमटी!

नव्या फळबागांना प्रोत्साहन

यंदाच्या आराखड्यानुसार ४,०८८ हेक्टर क्षेत्रावर नव्या फळबागांसाठी १८ कोटी ३८ लाख रुपये अनुदान वितरित करण्यात येणार आहे. तसेच १,५०० हेक्टर जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी ३ कोटी ३० लाख रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

संरक्षित शेतीलाही चालना

अभियानातून ५०० वैयक्तिक शेततळ्यांसाठी सुमारे दीड कोटी रुपये, तर ११०० शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी ८ कोटी २५ लाख रुपये अनुदान देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संरक्षित शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी हरितगृह आणि शेडनेटसाठी ९ कोटी १५ लाख रुपये, तर लागवड साहित्यांसाठी १० कोटी ५५ लाख रुपये अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.

फलोत्पादन अभियानामुळे राज्यातील फलोत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळाली. गेल्या दोन दशकांत उत्पादनवाढीवर भर होता. आता अभियानाचा कल काढणीपश्‍चात व्यवस्थापनाकडे वळत असून, त्यामुळे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस मदत होईल.
अंकुश माने, कृषी संचालक (फलोत्पादन)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com