Indian Agriculture Horticulture Sector: फळे, भाजीपाला, मसाला पिके, लागवडीची (प्लँटेशन) पिके आणि मध यांचा समावेश असलेल्या देशाच्या फलोत्पादन क्षेत्राने २०२५-२६ या हंगामात विक्रमी कामगिरी नोंदविली आहे. चालू पीक वर्षात (जुलै २०२५ ते जून २०२६) देशाचे एकूण फलोत्पादन सुमारे ३७.७८ कोटी टन इतके होण्याचा अंदाज असून, मागील वर्षी ते ३७.०७ कोटी टन होते. केंद्रीय कृषी विभागाने जाहीर केलेल्या दुसऱ्या आगाऊ अंदाजात ही माहिती देण्यात आली आहे..फलोत्पादनाखालील क्षेत्रातही किरकोळ वाढ झाली असून ते ३.०१ कोटी हेक्टर झाले आहे. मागील वर्षी हे क्षेत्र या आकडेवारीच्या जवळपासच होते..Horticulture Policy: नव्या धोरणापोटी, ‘फळे’ रसाळ गोमटी!.फळ उत्पादनात ३.२५ टक्क्यांची वाढ होऊन ते १२.१५ कोटी टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. केळी, आंबा, पपई, सफरचंद आणि पेरू यांच्या उत्पादनवाढीचा यात मोठा वाटा आहे. भाजीपाल्याचे उत्पादन २२.१ कोटी टनांवर जाण्याचा अंदाज असून बटाटा, टोमॅटो, वाटाणा, फ्लॉवर, दुधी भोपळा आणि भेंडी यांच्या उत्पादनात वाढ अपेक्षित आहे..कांदा क्षेत्रात २.३१ टक्क्यांनी वाढ होऊन ते २०.१ लाख हेक्टर झाले असले, तरी कांदा उत्पादन जवळपास स्थिर राहून ३.०७ कोटी टन राहण्याचा अंदाज आहे. बटाटा उत्पादन ५.९९ कोटी टन, तर टोमॅटो उत्पादन २.१५ कोटी टन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे..Agriculture Subsidy: कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फलोत्पादन अभियानांतर्गत ६०.८१ लाखांचे अनुदान मंजूर!.मसाला पिकांचे उत्पादन १.२७ कोटी टनांवर, तर फुलांचे उत्पादन ४५.८४ लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. लसूण, हळद, कढीपत्ता आणि मेथी यांच्या उत्पादनवाढीमुळे मसाला पिकांच्या उत्पादनाला चालना मिळाली आहे..आकडे सांगतात...उत्पादन २०२५-२६ अंदाजएकूण फलोत्पादन ३७.७८ कोटी टनफळ उत्पादन १२.१५ कोटी टनभाजीपाला उत्पादन २२.१० कोटी टनकांदा उत्पादन ३.०७ कोटी टनफुलांचे उत्पादन ४५.८४ लाख टनस्रोत : दुसरा आगाऊ अंदाज(केंद्रीय कृषी विभाग).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.