Sustainable Agriculture Day: डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस ७ ऑगस्ट ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा होणार

Dr. M.S. Swaminathan's Jayanti: भारताच्या हरितक्रांतीचे जनक, शेतकऱ्यांचे खरे मार्गदर्शक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस ७ ऑगस्टला असतो. यावर्षी त्यांच्या १००व्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाने हा दिवस ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dr. M.S. Swaminathan
Dr. M.S. SwaminathanAgrowon
Published on
Updated on

Pune News : भारताच्या हरितक्रांतीचे जनक, शेतकऱ्यांचे खरे मार्गदर्शक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस ७ ऑगस्टला असतो. यावर्षी त्यांच्या १००व्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाने हा दिवस ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. स्वामिनाथन यांच्या विज्ञानाधारित शेती, हवामान अनुकूल शेती, अन्न सुरक्षा आणि महिला शेतकरी सशक्तीकरणातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जाणार आहे. यासाठी राज्यभर विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.

Dr. M.S. Swaminathan
Sustainable Farming : शाश्वत शेतीकडे वळणे गरजेचे

‘शाश्वत कृषी दिन’ साजरा करण्यासाठी कृषी आयुक्तालयाकडून लवकरच अधिकृत सूचना जाहीर करण्यात येणार आहेत. या निमित्ताने राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर विविध कार्यक्रम, चर्चासत्रे, जनजागृती उपक्रम तसेच शेतकरी संवादाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच, कृषी विद्यापीठांमध्ये शाश्वत शेती या विषयावर विशेष सादरीकरणे व संशोधन सत्रे घेण्यात येणार असल्याचेही कोकांटेनी सांगितले.

‘डॉ. एम.एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर’ ची स्थापना

तसेच, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये ‘डॉ. एम.एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर संशोधन केंद्र’ स्थापन केली जाणार आहेत. हे केंद्र नवकल्पना विकसित करून त्या तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहे.

Dr. M.S. Swaminathan
Sustainable Agriculture: शाश्वत शेती आव्हाने आणि संधी

डॉ. स्वामिनाथन यांच्या नावे पुरस्कार योजना

यावर्षीपासून डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या नावे राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करण्यात येणार आहेत. शाश्वत शेतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्काराद्वारे सन्मानित केले जाईल.

शेतीसाठी ५ हजार कोटींची वार्षिक गुंतवणूक

त्याचबरोबर, शेतकऱ्यांचे जीवन अधिक टिकावू आणि सुरक्षित करण्यासाठी राज्य शासन दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक शेती क्षेत्रात करणार आहे. या निधीतून कांदा चाळ, साठवणगृहे, आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले असून, त्याबाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर होणार आहे.

५० धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी

मागील सहा महिन्यांत राज्य सरकारने घेतलेल्या ५० महत्त्वाच्या कृषी धोरणात्मक निर्णयांमुळे उत्पादनक्षमता, साठवण क्षमता आणि बाजारातील स्थैर्य वाढण्यास मदत होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com