Crop Loan Distribution : चंद्रपूर जिल्ह्यात १६ ते २२ दरम्यान पीककर्ज वाटप सप्ताहाचे आयोजन

Kharif Crop Loan : पीककर्ज योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेती खर्च, पीक लागवड, तसेच इतर गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Chandrapur News : जिल्ह्यात १६ ते २२ जून या कालावधीत पीककर्ज वाटप सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाभर विशेष मेळावे घेऊन शेतकऱ्यां-यांना पीक कर्जाचे वाटप करावे, असे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहे.

पीककर्ज योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेती खर्च, पीक लागवड, तसेच इतर गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते. चंद्रपूर जिल्ह्यात पीककर्ज वाटपाला गती मिळावी, कोणताही शेतकरी वंचित राहू नये, या उद्देशाने खरीप हंगाम-२०२५ करिता शेतकऱ्यांना बँका आणि संलग्न विभागाच्या समन्वयाने पीककर्ज वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांच्या संकल्पनेतून १६ ते २२ जून या कालावधीत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक बँक शाखेत सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, बँकेचे शाखा व्यवस्थापक, सहायक निबंधक, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), तालुका पशुसंवर्धन अधिकारी, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय आदींनी अचूक व परिणामकारक नियोजन करावे. तसेच प्रत्येक बँकेच्या शाखेत १६ ते २२ जून या सप्ताहात दररोज सकाळी ११ ते सायं. ४ या वेळेत कर्ज वाटप मेळावे आयोजित करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

या कॅम्पचे पर्यवेक्षण करण्याकरिता तहसीलदारांनी तालुक्यातील महसूल, कृषी, ग्राम विकास आणि सहकार विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी/ कर्मचाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी. नोडल अधिकाऱ्यांनी सप्ताहाच्या कालावधीत दररोज किमान ३ तास नेमून दिलेल्या बँक शाखेला भेट द्यावी. पीक कर्ज वाटपाच्या मेळाव्यात सहभागी होऊन १०० टक्के शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप होईल, असे पाहावे.

Crop Loan
Crop Loan : सांगली जिल्ह्यातील ४३ हजार शेतकऱ्यांना पीककर्ज वितरित

कोणीही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.उपरोक्तप्रमाणे कागदपत्रे शेतकऱ्यांनी सदर मेळाव्यात सोबत आणण्यासाठी महसूल, ग्राम विकास, सहकार आणि कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी याबाबतची प्रचार प्रसिद्धी करावी. वरील नियोजन यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी व बैंक प्रतिनिधींनी परस्पर समन्वय ठेवून कार्यवाही करावी.

Crop Loan
Kharif Crop Loan : बँकांनी पीककर्ज मंजुरीला प्राधान्य द्यावे ः जिल्हाधिकारी

तसेच या मेळाव्याच्या फलनिष्पत्तीबाबत प्रत्येक बँक शाखा व्यवस्थापकाने पीक कर्ज वाटपाचा दैनंदिन अहवाल संबंधित तहसीलदारांना तसेच अहवालाची एक प्रत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, बैंक ऑफ इंडिया, चंद्रपूर यांच्याकडे संकलनासाठी सादर करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.

कर्ज वाटप मेळाव्यात खालील बाबींचा अंतर्भाव करावा

शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्ज अर्जाची प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे.

स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांना याची पूर्वकल्पना देऊन त्यांचा सहभाग वाढवावा.

सर्व बँक शाखांनी कर्ज प्रस्तावांची छाननी व मंजुरी प्रक्रियेसाठी तयारी ठेवून मेळाव्यात कर्जाचे वितरण करावे.

किसान क्रेडीट कार्ड योजनेअंतर्गत पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी कुक्कुटपालन व्यवसायात खेळत भांडवली कर्ज सर्व बँकांमार्फत उपलब्ध आहेत, याची शेतकऱ्यांना माहिती द्यावी. व पात्र शेतकऱ्यांना कर्ज द्यावे.

शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक पोर्टलवर फार्मर आयडी करून देण्यात यावे.

पीक कर्जाकरिता लागणारी कागदपत्रे

१. आधारकार्ड, २. पॅन कार्ड, ३. दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, ४. बँक पासबुकची प्रत, ५. ७/१२ उतारा, ६. नमुना ८अ, ७. कर्ज नसल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com