Agriculture Development: बीजोत्पादन क्षेत्राचा विकास, जमिनीचे आरोग्य सुधारणार

Agricultural Activities: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा-२ अंतर्गत राज्यातील २१ जिल्ह्यांत बीजोत्पादन, जैविक खते व जमिनीच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे उपक्रम राबवले जाणार आहेत.
MoU between Mahabeej and Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Project
MoU between Mahabeej and Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani ProjectAgrowon
Published on
Updated on

Akola News: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा-२ अंतर्गत राज्यातील २१ जिल्ह्यांमधील एकूण ६९५९ गावांमध्ये विविध कृषी विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. हवामान अनुकूल पीक वाणांचे बीजोत्पादन, जमिनीच्या सुपीकतेसाठी उपाययोजना, फळबाग व बांबू लागवड, तसेच जिवाणू खतांची निर्मिती यांसारख्या घटकांचा समावेश असणार आहे.

यामुळे बीजोत्पादन क्षेत्राचा विकास होण्यास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास व जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होण्यास निश्‍चित मदत होणार आहे. या हेतूने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व ‘महाबीज’मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी प्रकल्प संचालक परिमल सिंह, ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

MoU between Mahabeej and Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Project
Agriculture Development: समतोल विकासाचा सर्वोत्तम पर्याय

या सामंजस्य करारामुळे राज्यातील २१ जिल्ह्यांतील सुमारे १५ हजार महाबीज बीजोत्पादक शेतकऱ्यांना स्त्रोत बियाण्यांच्या किमती व बीज प्रमाणीकरण नोंदणी शुल्क परताव्याच्या माध्यमातून आर्थिक साह्य मिळणार आहे. महाबीजमार्फत उत्पादित जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा आणि जैविक खतांचा संघ ‘महाजैविक’ या उत्पादनांचा शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येणार आहे.

MoU between Mahabeej and Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Project
Agricultural Development: कसोटी धोरणात्मक कौशल्याची!

तसेच महिला शेती शाळांच्या माध्यमातून तीन हजार महिला शेती शाळांमध्ये सहभागी ९० हजार महिला शेतकऱ्यांना प्रति हंगामानुसार प्रत्येकी एक किलो ट्रायकोडर्मा आणि २५० मिलि महाजैविक याप्रमाणे एकूण ९०० क्विंटल ट्रायकोडर्मा व २२,५०० लिटर महाजैविक पुरवले जाणार आहे.

या उपक्रमाच्या अनुषंगाने परिमल सिंह यांनी अकोला येथील महाबीजच्या बीज परीक्षण प्रयोगशाळा, बीज प्रक्रिया केंद्र आणि मुख्यालयास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. या प्रसंगी ‘पोकरा’चे मृद्‍ विज्ञान विशेषज्ञ विजय कोळेकर व ‘महाबीज’चे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com