Mahabeej: चार जिल्ह्यांत सुरू झालेल्या ‘महाबीज’चा राज्यभर विस्तार
Akola News: ‘सुरुवातीस केवळ चार जिल्ह्यांत असलेले महाबीजच्या कार्याचा १९८० ते १९८४ या कालावधीत तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक विश्वासराव धुमाळ यांनी केंद्र सरकार व राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा करून राज्यभर विस्तार केला, असे प्रतिपादन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात ‘महाबीज’चे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण झाले असून या निमित्ताने महाबीज मुख्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
या वेळी आजपर्यंत महाबीजला लाभलेले अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या कार्यकाळात झालेल्या विशेष घडामोडींना कुंभेजकर यांनी उजाळा दिला. या प्रसंगी अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख, डॉ. रणजित सपकाळ, बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे संचालक अंकुश माने यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात महाबीजच्या मुख्यालयात वृक्षारोपणाने झाली. या निमित्याने मागील दोन वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केलेले बीजोत्पादक, शेतकरी, महाबीज विक्रेते, महाबीज अधिकारी, कर्मचाऱ्यांना महाबीज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.प्रास्ताविक गुणनियंत्रण व संशोधन महाव्यवस्थापक डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

