Biogas
Biogas Agrowon

Biogas Plant Project : जगातील सर्वात मोठा बायोगॅस संयंत्र निर्मिती कारखाना पुण्यात

Biogas Plant Manufacturing : बायोगॅस संयंत्र निर्मिती क्षेत्रात जगातील सर्वात मोठा कारखाना पुण्याच्या चाकण भागात उघडण्यात आला आहे.
Published on

Pune News : बायोगॅस संयंत्र निर्मिती क्षेत्रात जगातील सर्वात मोठा कारखाना पुण्याच्या चाकण भागात उघडण्यात आला आहे. सिस्टेमा बायो कंपनीने हे धाडसी पाऊल टाकले असून पुढील दोन वर्षात बायोगॅसची सव्वा लाख संयंत्रे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सिस्टेमाची स्थापना अॅलेक्स इटॉन व कॅमिलो पेजेस या दोन पर्यावरणप्रेमी उद्योजकांनी २०१० मध्ये मेक्सिकोत केली. मात्र, त्यांनी कंपनीचे जागतिक मुख्यालय पुण्यात उघडले आहे.

येथून आतापर्यंत देशभरात ५० हजार शेतकऱ्यांना बायोगॅस पुरविले आहेत. सहसंस्थापक इटॉन, पेजेस व व्यवस्थापकीय संचालक पियुष सोहनी यांनी सोमवारी (ता. ५) कंपनीच्या सर्वात मोठ्या संयंत्र निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केले.

Biogas
Biogas Project Update : विदर्भ-मराठवाड्यात उभारणार ११ हजार बायोगॅस प्रकल्प

इटॉन म्हणाले, ‘‘जगात ४०० दशलक्ष शेतकरी अल्पभूधारक आहेत आणि तेच ७० टक्के अन्नधान्याची निर्मिती करीत आहेत. भारतासह आणि जगातील साऱ्या शेतकऱ्यांना चांगले जीवनमान, उत्तम आरोग्य आणि हवामान बदलास सामोरे जाण्याची क्षमता मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवे.

या ध्येयात बायोगॅसच्या माध्यमातून आमची कंपनी पुढाकार घेत असल्याचा अभिमान मला आहे. आम्ही बायोगॅस संकल्पनेत क्रांती आणली असून सर्व तंत्रज्ञान आधुनिक, सुटसुटीत आणि किफायतशीर केले आहे.’’

Biogas
Biogas Project : विभागीय आयुक्त राव यांच्या हस्ते बायोगॅस प्रकल्पाचे उद्‍घाटन

चाकण भागात १५ कोटी रुपये खर्चून १.३० लाख चौरस फुटावर उभारलेल्या या बायोगॅस संयंत्र निर्मिती प्रकल्पात वार्षिक एक लाख संयंत्रे तयार होण्याची क्षमता आहे. स्वच्छ स्वयंपाक आणि रसायनमुक्त शेती अशी संकल्पना मांडणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी सिस्टिमाकडे जगातून आतापर्यंत १.८ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक झालेली आहे.

सध्या पुण्यात वार्षिक ३० हजार संयंत्रे तयार होतात. सिस्टिमाने बायोगॅस भट्टी व मेम्ब्रेन टेम्पलेटच्या तंत्रज्ञानाचे भारतीय पेटंट प्राप्त केले आहे. २०३० पर्यंत एकट्या भारतात दहा लाख शेतकऱ्यांपर्यंत संयंत्र नेण्याचे ध्येय कंपनीचे आहे.

भारताला बायोगॅसची ओळख

जगाच्या तुलनेत गेल्या ६० वर्षांपासून बायोगॅस तंत्र भारतात वापरले जात आहे. येथील शेतकरी चौकस व कष्टाळू आणि अभियंत्यांची शक्तीही मोठी आहे. मात्र, या क्षेत्रात तंत्रज्ञान विकास, सेवा, प्रशिक्षण आणि गुंतवणूक या मुद्दांवर काम झाले नाही.

परिणामी देशात ५० लाख संयंत्रे बसविली गेली आणि त्यातील निम्मी बंद आहेत. आम्ही मात्र संयंत्रातून नव्या तंत्रज्ञानातून भारतीय शेतकऱ्यांना पुन्हा शाश्वत ऊर्जा वापराकडे नेणार आहोत, असे सिस्टिमाच्या वतीने सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com