Biogas Project
Biogas ProjectAgrowon

Biogas Project : विभागीय आयुक्त राव यांच्या हस्ते बायोगॅस प्रकल्पाचे उद्‍घाटन

विभागीय आयुक्त कार्यालयात १० हजार लिटर साठवण क्षमता असलेल्या मॉड्युलर बायोगॅस प्रकल्पाचे उद्‍घाटन विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले.
Published on

पुणे : विभागीय आयुक्त कार्यालयात १० हजार लिटर साठवण क्षमता असलेल्या मॉड्युलर बायोगॅस प्रकल्पाचे (Modular Biogas Project) उद्‍घाटन विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh Rao) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, नयना बोंदार्डे, रामचंद्र शिंदे, राहुल साकोरे, सह आयुक्त पूनम मेहता उपस्थित होत्या.

Biogas Project
Biogas : बायोगॅसद्वारे विद्युतनिर्मितीचे तंत्र

विभागीय आयुक्त राव म्हणाले, की हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याने उपयुक्त आहे. यामध्ये दररोज १०० किलो कचरा जिरवला जाणार आहे. आयुक्त कार्यालयाच्या आवारात असलेल्या उपहारगृहातील ओला कचरा या बायोगॅस प्रकल्पासाठी वापरला जाणार असून ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरीतीने होणार आहे.

Biogas Project
Biogas plant : शेणाची गरज नसणारे बायोगॅस संयंत्र

ते म्हणाले, की विभागीय आयुक्त कार्यालय, कष्टकरी पंचायत व वायू कंपनीच्या संयुक्त प्रयत्नाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून असे प्रकल्प जिल्हाधिकारी कार्यालय, विद्यापीठ, जिल्हा परिषद आदी ठिकाणी कार्यान्वित करावेत.

तसेच पुणे विभागातील अन्य सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयांतही प्रकल्प सुरू करावा. प्रकल्प राबवताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने सोडवल्या जातील याकडे लक्ष द्यावे.

तसेच इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या वेळी आयुक्त राव यांनी प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com