Biogas Project Update : विदर्भ-मराठवाड्यात उभारणार ११ हजार बायोगॅस प्रकल्प

Vidarbha Marathwada News : दुग्ध विकास प्रकल्पातून ९ हजार रुपयांत होणार उभारणी
Biogas Project
Biogas ProjectAgrowon

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा
Biogas Plants Nagpur : विदर्भ, मराठवाड्यात दुग्ध विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात दूध संकलन २०२६ पर्यंत ६ ते १० लाख लिटर पर्यंत वाढविण्याचे प्रस्तावित आहे आहे.

यातून अर्थकारणाला गती मिळत असतानाच जनावरांपासून मिळणाऱ्या शेणाचा देखील विनियोग व्हावा याकरिता ११ हजार बायोगॅस सयंत्र अनुदानावर दिले जाणार आहेत. अवघ्या ९ हजार रुपयाचा भरणा त्याकरिता करावा लागणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भ, मराठवाड्यात दुग्ध उत्पादन वाढीच्या उद्देशाने दुग्ध विकास प्रकल्पासाठी पाठपुरावा केला. त्याचीच फलश्रुती म्हणजे या दोन्ही विभागांत पशुपालनाला चालना मिळत दूध संकलन तीन लाख लिटरपर्यंत पोहोचले आहे.

या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. त्या अंतर्गत २०२६ पर्यंत दूध संकलनात सध्याच्या तीन लाख लिटरवरुन ६ ते १० लाख लिटरपर्यंत वाढ प्रस्तावित आहे.

दूध संकलनात वाढ व्हावी याकरिता १ लाख ६५ हजार भाकड जनावरांवर उपचार केले जातील.

शॉर्ट टर्म उपचारामध्ये ११ हजार जनावरांची खरेदी होणार आहे तर लॉग टर्ममध्ये आय.व्ही.एफ., लिंगवर्गीकृत मात्रा देण्याचे नियोजन आहे.

प्रकल्पात पाच हजार गावे आणि बारा जिल्ह्यांचा समावेश आहे.

Biogas Project
Milch Cattle : विदर्भ-मराठवाड्यात देणार ११ हजार दुधाळ जनावरे

हिरव्या चाऱ्याची उपलब्धता ही विदर्भात मोठी समस्या आहे. दीड ते दोन दिवसांत हिरवा चारा खराब होतो. सायलेजमध्ये ही समस्या उद्‍भवत नाही.

त्यामुळे प्रकल्पातून अनुदानावर सायलेज बेलिंग मशिन शेतकरी कंपन्यांना देण्यात येतील. दूध संकलन केंद्रावरच शेतकऱ्यांना खाद्याची उपलब्धता होईल.

याची परतफेड दूध विक्रीच्या पैशातून करता येणार आहे. कालवडीच झाल्या पाहिजे याकरिता लिंगवर्गीकृत मात्रा सोबतच आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

त्याकरिता महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठासोबत करार करण्यात येणार आहे. तंत्रज्ञान बेस स्मार्ट फार्मिंग ही प्रकल्पाची थीम असणार आहे. एनडीडीबी आणि भारत सरकार यांच्याकडून ५०० कृत्रिम रेतन केंद्र उभारण्यात येणार आहेत.

मोबाईल व्हेटरनरी व्हेइकल्स ही संकल्पना राबवीत गावखेड्यात पशुपालकांच्या दारीच उपचार होतील. त्याकरिता कॉल सेंटरही प्रस्तावित आहे.

विदर्भ मराठवाड्यात उभारण्यात येणाऱ्या ११,००० बायोगॅस सयंत्रांचा खर्च पन्नास हजार रुपयांच्या घरात आहे. अनुदानावर केवळ ९००० रुपयांत त्याची उभारणी करून दिली जाईल.

देशात केंद्र, राज्य, एनडीडीबी अणि मदर डेअरी एकत्रित काम करणारे विदर्भ, मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प हे एकमेव मॉडेल आहे. देशाच्या इतर भागात एनडीडीबी केवळ दूध संकलनाचे काम करते. त्यामुळेच प्रकल्पाची अंमलबजावणी गतिमान पद्धतीने होत आहे.

अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रकल्पातून ११ हजार बायोगॅस दिले जातील. त्याकरिता ९ हजार रुपये आकारण्यात येणार आहेत.
- डॉ. सतीश राजू,
उपसंचालक, विदर्भ, मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com