Tree Conservation : कुऱ्हाड बंदीला साथ देऊन वृक्ष संवर्धन करावे

Latest Agriculture News : स्थानिक नागरिकांनी या भागात कुऱ्हाड बंदी व चराई बंदी करून वृक्ष संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहन सरपंच राजेंद्र मेहेर, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी केले आहे.
Tree Plantation
Tree PlantationAgrowon
Published on
Updated on

Pune News : वारूळवाडी ग्रामपंचायत आणि जुन्नर वनविभागाच्या वतीने गणपीर बाबा डोंगर परिसरातील साडेपाच एकर क्षेत्रामध्ये सुमारे पाच हजार देशी व औषधी वनस्पतींच्या रोपांची लागवड येत्या आठ दिवसांत करण्यात येणार आहे.

स्थानिक नागरिकांनी या भागात कुऱ्हाड बंदी व चराई बंदी करून वृक्ष संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहन सरपंच राजेंद्र मेहेर, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी केले आहे.

वृक्षारोपणाचा प्रारंभ वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच ज्योती संते यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी बाळासाहेब भुजबळ, एम. डी. भुजबळ, आदित्य डेरे, किरण गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य नारायण दुधाने, विकास गाडेकर, संतोष कोल्हे आदी उपस्थित होते.

Tree Plantation
Mango Tree: लहानपणाच्या आमराया कुठे गेल्या?

सरपंच मेहेर म्हणाले, ‘‘वारूळवाडी ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांनी केलेल्या मदतीतून गणपीर बाबा डोंगर परिसरात रस्ते, पायऱ्या, पाणीपुरवठा आदी विकास कामे करण्यात आली असून, गणपीर बाबा देवस्थान परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या भागात बिबट्या, कोल्हा, ससा, लांडगा आदी वन्यप्राणी आढळून आले आहेत.

Tree Plantation
Bael Tree Plantation : वनशेतीमध्ये बेल लागवड फायदेशीर

या भागात रोज सकाळी पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. डोंगराच्या पायथ्याशी सुमारे साडेपाच एकर क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये लिंब, पिंपळ, आवळा, आंबा, करंज, बेहडा, चिंच, हिरडा, बांबू आदी पाच हजार देशी व औषधी वनस्पतींचे रोपण करण्यात येणार आहे.

परिसराला घायपात झाडाचे कंपाउंड लावण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांनी या भागात कुऱ्हाड बंदी व चराई बंदी करून वृक्ष संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहन सरपंच मेहेर यांनी केले आहे. वृक्षारोपणाचे नियोजन पोलिस पाटील सुशांत भुजबळ, वन अधिकारी अनिता भुजबळ, सुवर्णा खुटेकर, वनरक्षक पवार, खंडू भुजबळ यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com