Mango Tree: लहानपणाच्या आमराया कुठे गेल्या?

Team Agrowon

गावालगतच्या आमराई

लहाणपणी उन्हाळ्याच्या सुटीत गावात आम्हा मुलांचा दुपारचा बहुतांश वेळ हा गावालगतच्या आमराईतच जायचा.

Mango Tree | shashikant Kendre

आंब्यांचा शोध घेणे

कच्च्या कैऱ्या पाडणे, कोकिळेचा आवाज ऐकत बसणे, पाडावर आलेल्या आंब्यांचा शोध घेणे, डाबडुबीचा खेळ खेळणे आणि मध्ये-मध्ये आमराईच्या जवळूनच वाहणाऱ्या अरुणावतीच्या खोल डोहामध्ये मनसोक्त डुंबने हे आमचे आवडते उद्योग.

Mango Tree | shashikant Kendre

आमराईतल्या थंडगार वातावरण

आसपास जेव्हा उन्हाचा वणवा पेटलेला असायचा त्याही वेळी आमराईतल्या थंडगार वातावरणात आमचा उन्हाळा सुसह्य व्हायचा.

Mango Tree | shashikant Kendre

आजोबा आंबे

कैऱ्या उतरवणीयोग्य झाल्या की आजोबा आंबे उतरवण्याचा ठेका `उताऱ्याला` द्यायचे. आंबे उतरवणीचा दिवस मोठा लगबगीचा असायचा.

Mango Tree | shashikant Kendre

आंबे दोरीच्या `झेल्या`

मोठ्या बांबूच्या काठीवर जाळीच्या खुडी घेऊन उतारे आजोबांसोबत आमराईत यायचे. झाडावर चढण्यात निष्णात असणारे उतारे सरसर झाडावर चढायचे. खुडीने तोडलेले आंबे दोरीच्या `झेल्या`मधून खाली सोडले जायचे. 

Mango Tree | shashikant Kendre

आंब्यांची वाटणी

कच्च्या आंब्यांचा मोठा ढीग लागायचा. शेवटी आंब्यांची वाटणी व्हायची. पैशाचा स्वरुपात उताऱ्यांना मोबदला देण्याची प्रथा नव्हती. मोबदला आंब्यांच्या स्वरुपातच दिल्या जायचा. आंबे मोजण्याच्या पारंपरिक एककात आंब्याची मोजदाद व्हायची. सहा आंब्यांचा एक फाडा. 

Mango Tree | shashikant Kendre
Chicken | Agrowon