पुणे ः मॉन्सूनच्या (Monsoon Season) लांबलेला मुक्काम आणि सततच्या बरसल्यामुळे यंदाच्या खरिपात (Kharif Season) भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. तर रब्बीच्या पेरण्यांना (Rabi Sowing) देखील होत असलेल्या उशिरामुळे गेल्या महिनाभरापासून बाजारात फळभाज्यांची आवक कमी होत चालली आहे. रविवारी (ता.२) पुणे कृषी उत्पन्न बाजार (Pune APMC) समितीमध्ये भाजीपाल्याची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने संतुलित होती.
तर फळभाज्यांना मागणी चांगली असल्याने कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, सिमला मिरची, फ्लॉवर, कोबी, मटार, पावट्याची भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. बाजारात बहुतांश फळभाज्यांची आवक, मागणी आणि दर कायम असल्याने इतर फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते
विविध भाजीपाल्यांच्या आवकेत राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून २ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, इंदौर येथून २ टेम्पो गाजर, गुजरात येथून ५ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून ३ टेम्पो घेवडा तर मध्य प्रदेशातून लसणाची १० ते १२ ट्रक इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार गोणी, टोमॅटो सुमारे हजार क्रेटस, गवार आणि भेंडी प्रत्येकी ७ टेम्पो, हिरवी मिरची ३ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, स्थानिक मटार ४० गोणी, गाजर २ टेम्पो, तांबडा भोपळा१० टेम्पो,
शेवगा २ टेम्पो, कांदा ५० ट्रक यांसह इंदूर आणि आग्रा, इंदौर येथून बटाटा ७० ट्रक तर आग्रा, इंदोर आणि पुणे विभागातून बटाटा ५० ट्रक इतकी आवक झाली होती.फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : १००-१९०, बटाटा : २००-२५०. लसूण : १००-४००, आले सातारी : १००-३५०,
भेंडी : ३००- ४००, गवार : गावरान व सुरती ५००-६००, टोमॅटो : १५०-३००, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : ५००-६००, दुधी भोपळा : २००-२५०, चवळी : २००-२५०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी :२००-२५०, पापडी : ३५०-४००, पडवळ : २००-२५०, काकडी : १००-१२०,
फ्लॉवर : ३००-३५०, कोबी : १२०-२२०, वांगी : ३००-४००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ३००-५००, तोंडली : कळी ४५०-५००, जाड : २००-२५०, शेवगा : ६००-८००, गाजर : ३००-४००, वालवर : ३५०-४००, बीट : २५०-३००, घेवडा : ६००-८००, कोहळा
: १००-१५०, आर्वी :२००-२५०, घोसावळे : ३००-३५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ३५०-४००, मटार : स्थानिक: १६००-१८००, पावटा : ६००- ६५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
पालेभाज्या महागच
खरिपातील सततच्या पावसाने पालेभाज्या खराब झाल्याने उत्पादन घटले आहे. परिणामी बाजारात पालेभाज्यांची आवकही कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे सर्वच पालेभाज्यांचे भाव वाढलेले आहेत. रविवारी (ता.२) कोथिंबिरीची दीड लाख तर मेथीची ५० हजार गड्ड्यांची आवक झाली. आवक कमी होत असल्याने पालेभाज्यांच्या भावात पुन्हा दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली होती.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १५००-३५००, मेथी : ८००-१६००, शेपू : ६००-८००, कांदापात : ८००-१५००, चाकवत : ६००-८००, करडई : ४००- ६००, पुदीना : ३००-६००, अंबाडी : ५००-७००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ८००-१२००, चुका : ८००-१०००, चवळई : ४००-६००, पालक : ८००-१५००.
फळ बाजार
फळ बाजारात रविवारी (ता.२) लिंबाची सुमारे २ हजार गोणी, डाळिंब ४० टन, पपई ३ टेम्पो, चिक्कू ५०० गोणी, मोसंबी ८० टन, संत्रा ३० टन, पेरू ७०० क्रेट, कलिंगड १० गाडी, खरबूज ४ पिकअप, सीताफळ २० टन आवक झाली होती.
विविध फळांचे दर पुढीलप्रमाणे
लिंबे (गोणीस) - २००-५००, डाळिंब (किलो) गणेश - १०-५०, भगवा ४०-२००, आरक्ता १०-६०, पपई प्रति किलो -५-२०, पेरू (२० किलो) -३००-५००, सीताफळ - २०-२००, कलिंगड १२-३० खरबूज १०-३५, मोसंबी ३ डझन १३०-२५०, ४ डझन ४०-१२०. संत्रा (१० किलो) २००-५००.
मटण मासळी
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता.२) खोल समुद्रातील मासळी सुमारे ६ टन, खाडीची आणि नदीची प्रत्येकी सुमारे ३०० किलो तर आंध्र रहू कटला सिलनची सुमारे १० टन आवक झाली होती.
विविध मासळीची प्रति किलोचे दर खालीलप्रमाणे
खोल समुद्रातील मासळी
पापलेट - कापरी १८००, मोठे १५००-१६००, मध्यम ८००-१०००, लहान ६००-७००, भिला ५००-६००, हलवा ४८०-६००, सुरमई ४००-६००, रावस लहान ४८०-६००, मोठी ८५०, घोळ ७००, करली ३००-३२०, कंरदी ४००-४८०, भिंग ३००-३५०, पाला १०००-१४००, वाम ६००-७००, ओले बोंबील १००-२००.
कोळंबी - लहान १२०-२८०, मोठी ३६०-५५०, जंबोप्रॉन्स १२००-१४००, किंगप्रॉन्स ७५०-८००, लॉबस्टर १६००-१८००, मोरी २००-३२०, मांदेली १००-१६०, राणीमासा १६०-२००, खेकडे २००-३००, चिंबोऱ्या ४८०-६००. खाडीची मासळी - सौदाळे - २००-३००, खापी १६०-२००, नगली ३००-४००, तांबोशी ४००४८०, पालु २००-२८०, लेपा १२०-१६०, बांगडा लहान १२०-१४०, मोठा १८०-२००, शेवटे २००-२४०, पेडवी ८०-१००, बेळुंजी१२०१४०, तिसऱ्या २००-२४०, खुबे १००-१२०, तारली १६०-१८०.
नदीची मासळी - रहू १६०-१८०, कतला १६०, मरळ ४००-४४०, शिवडा २००-२४०, खवली २२०२४०, आम्ळी १२०-१४०, खेकडे ३००-३६०, वाम ५५० - ६००.चिकन - चिकन २२०, लेगपीस २७०, जिवंत कोंबडी १६०, बोनलेस ३२०,अंडी - गावरान शेकडा ८१०, डझन १२, प्रति नग १०, इंग्लिश शेकडा ४४५, डझन ६६, प्रति नग ५.५०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.