
जळगाव ः जिल्ह्यात लसीकरण पूर्ण केलेल्या पशुधनातही ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin Disease) ची बाधा झाली आहे. यामुळे पशुपालकांमध्ये (Animal Husbandry) चिंता आहे. जिल्ह्यात पशुधनावर (Livestock) ‘लम्पी’चा फैलावही वेगात होत असून,रोज २०० पेक्षा अधिक पशुधन या आजाराला बळी पडत आहे. लम्पीबाबत प्रशासनाने कागदावरच कार्यवाही अधिक केली आहे.
फक्त गोठ्यात धुरळणीसाठी ग्रामपंचायतींनी अपवाद वगळता पुढाकार घेतलेला नाही. सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य या आजाराबाबत उदासीन आहेत. लोकप्रतिनिधींनीदेखील याबाबत कुठेही आपली स्पष्ट मागणी, मुद्दा उपस्थित केलेला नाही. आजारी पशुधनावर उपचारासाठी शेतकऱ्यांना खासगी पशुवैद्यकांची मदत घ्यावी लागत आहे.
कारण शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांत सकाळी व दुपारी शुकशुकाट असतो. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. हे दवाखानेही रामभरोसे आहेत. यामुळे शेतकऱ्यांची अडचण ठरत आहे. शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. लंपीसंबंधी कुठली औषधी खासगी पशुवैद्यक देतात, हादेखील मुद्दा आहे. खासगी पशुवैद्यकाने उपचार केलेले असल्यास शासकीय पशुवैद्यक उपचारासाठी नकार देतात.
पशुधन आजारी पडल्यानंतर शासकीय पशुवैद्यकांना कळविल्यास ही मंडळी दखल घेत नाही. आपण बागेर आहोत, उद्या येतो, वेळ नाही, अशा बाता करतात. यामुळे अधिकची अडचण तयार होत असून, शेतकऱ्यांसमोर पशुधनाचा मृत्यू ओढवत आहे. जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. पण शासन, प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवीत आहे.
जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागाला गांभीर्य नाही. राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभागही रोज हवेतील गप्पा करीत आहे. पुरेशी औषधी पशुवैद्यकीय दवाखान्यांत नाही. यामुळेदेखील शासकीय यंत्रणेचे वाभाडे बाहेर येत आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी पशुपालक करीत आहेत.
‘लम्पी स्कीन’बाबत प्रशासन उदासीन...
‘लम्पी’चा आजार वेगाने जिल्ह्यात पसरत असून, २० हजारांपेक्षा अधिक पशुधन आजारी आहे. तसेच मृत्यूदेखील १८० पर्यंत पोहोचले आहेत. प्रशासन फक्त आपल्या संपर्कातील पशुधनाच्या नोंदी घेत आहे. परंतु प्रशासन सर्वत्र पोहोचलेले नाही.
यामुळे मृत्यू अधिक झाल्यांतरही त्याच्या नोंदी कमी आहेत. प्रशासन आपला बचाव करण्यासाठी रोज लसीकरणाची आकडेवारी जाहीर करीत आहे. परंतु पशुधनाचे विलगीकरण, छावण्या व आजारी पशुधनावर उपचारात सातत्य याबाबत कुठेही कार्यवाही सुरू नाही. यातच ज्या पशुधनाचे मागील ८ - १० दिवसांत लसीकरण केले ते पशुधनही लंपी आजाराला बळी पडत आहे. यामुळे प्रशासनाच्या उपाययोजना कुचकामी ठरत
यातच ज्या पशुधनाचे मागील ८ - १० दिवसांत लसीकरण केले ते पशुधनही लंपी आजाराला बळी पडत आहे. यामुळे प्रशासनाच्या उपाययोजना कुचकामी ठरत
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.