Orange Pest : संत्र्यावर कोळी किडीचा प्रादुर्भाव

परभणी जिल्ह्यातील संत्रा फळपिकावर रसशोषण करणाऱ्या कोळी या किडीच्या प्रादुर्भावात वाढ होत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे फळांचा आकार, दर्जावर परिणाम होत आहे.
Orange Pest
Orange PestAgrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यातील संत्रा फळपिकावर रसशोषण (Orange Sucking Pest) करणाऱ्या कोळी या किडीच्या प्रादुर्भावात वाढ होत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे फळांचा आकार, दर्जावर परिणाम होत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक (Orange Farmer) शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

Orange Pest
Orange Export : संत्रा निर्यातीसाठी सवलतींची गरज

परभणी जिल्ह्यात परभणी, मानवत, पूर्णा या तालुक्यांमध्ये मोठ्या क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. यंदाच्या मृग बहाराच्या संत्र्यावर कोळी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याचे आढळून येत आहे. जालना, औरंगाबाद जिल्ह्यांत मोठे क्षेत्र असलेल्या मोसंबीवर देखील कोळी किडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. अन्य जिल्ह्यांतही लिंबूवर्गीय बागेमध्ये या किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

Orange Pest
Orange : संत्रा बागायतदारांना बांबूसाठी अनुदानावर हवे शेड

संत्रा, मोसंबी या लिंबूवर्गीय फळपिकांवर कोळी किडीच्या प्रादुर्भावात वाढ दिसून येत आहे. कोळी किडीचा प्रादुर्भाव वर्षभर आढळून येतो. परंतु ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान जास्त असतो. या किडीमुळे फळांचे नुकसान होऊन विकृत फळे तयार होतात. ही कीड पाने तसेच फळांची साल खरवडते. रसशोषण करते.

Orange Pest
Nagpur Orange : नागपुरी संत्रा म्हणून विदर्भातील फळाची आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डिंग

परिणामी, पानावर पांढूरके चट्टे पडतात. फळावर तपकिरी लालसर किंवा जांभळट रंगाचे चट्टे पडतात. याला शेतकरी ‘लाल्या’ म्हणून ओळखतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास फळातील फोडींची वाढ व्यवस्थित होत नाही. फळांची प्रत खालावते. त्यामुळे व्यापारी फळे खरेदी करत नाहीत. या किडीच्या व्यवस्थापनासाठी वेळोवेळी बागेची निरीक्षणे करून वेळीच उपाय करावेत. पाण्याचा ताण पडू देऊ नये.

निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी डायकोफॉल (१८.५ ईसी) २.७ मि. लि. किंवा डायफेनथीयूरोन (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी, असे आवाहन कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. एस. नेहरकर, डॉ. अनंत लाड, डॉ. योगेश मात्रे, डॉ. राजरतन खंदारे यांनी केले.

माझी नऊ वर्षे वयाची अडीच एकर संत्रा बाग आहे. गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांनी फळांच्या उत्पादनावर घट येत आहे. गतवर्षी लाल कोळीमुळे मोठे नुकसान झाले. यंदाही या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. पीक व्यवस्थापनावर मोठा खर्च होत आहे. उत्पन्न घटले आहे.
शिवाजी शिंदे, हत्तलवाडी, ता. मानवत, जि. परभणी
माझ्या १ हेक्टर संत्रा बागेत अतिवृष्टीमुळे पाणी साचून राहिल्याने मोठे नुकसान झाले. त्यात आता कोळी किडींच्या प्रादुर्भावामुळे पाने पिवळी पडत आहेत. फळगळ सुरु झाली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे.
महादेव राऊत, मांडाखळी, ता. परभणी.
परभणी जिल्ह्यातील संत्र्याच्या मोठ्या क्षेत्रावर कोळी किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. पाऊस बंद झाल्यानंतर लाल कोळी कीड अंडी घालते. नोव्हेंबर महिन्यात प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात फवारणी करणे आवश्यक आहे. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.
डॉ. अनंत लाड, कीटकशास्त्रज्ञ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com