Nagpur Orange : नागपुरी संत्रा म्हणून विदर्भातील फळाची आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डिंग

आजच्या काळात ब्रॅण्डला महत्त्व आहे. त्यामुळे ‘नागपुरी संत्रा’ म्हणून विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याची टीव्ही, रेडिओ आणि विविध माध्यमांचा वापर करीत जाहिरात झाली पाहिजे.
Nagpur Orange
Nagpur OrangeAgrowon
Published on
Updated on

नागपूर ः आजच्या काळात ब्रॅण्डला महत्त्व आहे. त्यामुळे ‘नागपुरी संत्रा’ (Nagpur Orange) म्हणून विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याची टीव्ही, रेडिओ आणि विविध माध्यमांचा वापर करीत जाहिरात झाली पाहिजे. जगभरात ज्यूसचे उत्पादन (Orange Juice Production) मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे टेबलफ्रूट म्हणूनच आपल्याला या संत्र्याचे नावलौकिक वाढवावा लागणार आहे. त्यासाठी महाऑरेंज (Maha Orange), केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था यांनी संयुक्‍तपणे ॲक्‍शन प्लॅन तयार करण्याची सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadakari) यांनी केली.

Nagpur Orange
Orange Export : संत्रा निर्यातीसाठी सवलतींची गरज

ॲग्रोव्हिजन प्रदर्शनाच्या निमित्ताने संत्रा उत्पादकांसाठी आयोजित कार्यशाळेत ते शनिवारी (ता. २६) बोलत होते. महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे, मनोज जवंजाळ, प्रशांत कुकडे, बदनापूर (जि. जालना) येथील मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष, डॉ. विनोद राऊत, डॉ. डी. एम. पंचभाई, डॉ. आर. एन. काटकर यांची या वेळी उपस्थिती होती.

Nagpur Orange
Orange : संत्रा बागायतदारांना बांबूसाठी अनुदानावर हवे शेड

गडकरी पुढे म्हणाले, की जागतिकस्तरावर विविध संत्रा वाणाचे एकरी उत्पादन ९० टन आहे. नागपुरी संत्र्याची उत्पादकता अवघी ८ टन आहे. हे चित्र बदलण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा. त्याआधारे नागपुरी संत्र्याची उत्पादकता ७५ टनांपर्यंत पोहोचली पाहिजे. प्रक्रियेकामी स्वतंत्र वाण विकसित करा. परंतु नागपुरी संत्र्याची ओळख ही कायम टेबल फ्रूट अशीच असली पाहिजे. ब्राझील, युरोपमध्ये पाच हॉर्सपॉवरच्या पंपाचा वापर करून हजारो लिटर ज्यूस तयार होतो.

त्यामुळे प्रक्रियेऐवजी टेबल फ्रूट म्हणून नागपुरी संत्र्याचे ब्रॅण्डिंग झाले पाहिजे. नागपुरी संत्र्याची गोडी वाढविण्यासाठी काय करता येईल यावर संशोधन होण्याची गरज आहे. त्या आधारे आंबट-गोड चव आणखी जिभेवर रुळणारी ठरेल. आजकाल चांगल असण्यासोबतच चांगल दिसणं ही महत्त्वाचं आहे. त्यामुळे विदर्भाच्या संत्र्यांचा एक ब्रॅण्ड तयार करा.

नागपुरी संत्रा असे नाव त्याला द्या, मदर डेअरीसह खासगी कंपन्यांच्या माध्यमातून विक्रीकरिता प्रोत्साहित करू पण त्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून त्याचे प्रभावी ब्रॅण्डिंग होणे गरजेचे आहे. राज्य, देश नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर तो पोहोचेल, अशा पद्धतीची व्युव्हरचना नागपुरी संत्र्याच्या ब्रॅण्डिंगसाठी आणली पाहिजे. संत्र बागांचे अस्तित्व टिकावे याकरिता दर्जेदार रोपांची उपलब्धता हवी. त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या २५ रोपवाटिका विकसित करा. संत्र्यात ड्रोनने फवारणीचे प्रयोग झाले पाहिजे.

संत्रा पिकात तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता वाढीचे उद्देश साधणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बागांना भेटीचा उपक्रम येत्या काळात राबविला जाणार आहे. त्याकरिता बॅटरीवर चालणारी विशेष बस उपलब्ध करून दिली जाईल. ही सेवा मोफत असेल आणि तंत्रज्ञान प्रसाराचे उद्दिष्ट त्यातून साधले जाणार आहे. एकमेकांशी संवाद आणि चर्चेतूनच संत्रा दर्जा सुधार आणि उत्पादकता वाढीचा पल्ला गाठणे शक्‍य होईल.

- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com