Team Agrowon
शेतकऱ्यांकडून निर्यात वाढल्यास हे अनुदान किंवा सवलतींमध्ये कपातीचे धोरण असावे, अशा प्रकारची मांडणी महाऑरेंजसह निर्यातदार व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली.
निर्यातीमध्ये ग्रेडिंग, कोटिंग आणि आकर्षक बॉक्स पॅकिंग या सर्व बाबींचे महत्त्व आहे.
मुंबई ते नागपूर असा संत्रा कंटेनर पाठविण्याचा खर्च ७० हजार रुपयांचा खर्च होतो.
निर्यातीला खरंच चालना मिळावी, असे वाटत असेल तर कंटेनरची उपलब्धता अनुदानावर झाली पाहिजे.
संत्र्याची मागणी असलेल्या नवीन देशांचा शोध घेणे, नवे निर्यातदार तयार करण्याकरिता देखील पणनस्तरावरुन प्रयत्न होणे गरजेचे आहे.
आयातशुल्क वाढीमुळे त्यालाही मर्यादा आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर निर्यातीला चालना मिळावी याकरिता पणन मंडळाने स्थापन केलेल्या अभ्यास समितीसमोर विविध मुद्दे मांडण्यात आले.
सुरुवातीला संत्रा प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर सवलती देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढल्यानंतर या सवलतींमध्ये कपात करता येईल.