Monsoon Update : परतीच्या पावसाचा धुमाकूळ

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा, लोणी येथे ५७ मिलिमीटर पाऊस
Weather Update
Weather UpdateAgrowon
Published on
Updated on

पुणे : परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात पावसाची चांगलीच रिपरिप सुरू आहे. तर, बारामती तालुक्यातील लोणी येथे ५७.० मिलिमीटर पाऊस पडला. तर, इंदापूर भागातही दमदार हजेरी लावली.(Heavy Rainfall) काही भागात थोडे ऊन पडू लागले तर, काही ठिकाणी पावसाचा शिडकावा सुरू असल्याने शेतातील कामे खोळंबली आहेत. मुक्काम वाढवलेल्या पावसाने पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले असून शेतकरी पुरता हैराण झाला आहे.

Weather Update
Banana Crop Management : शेतकरी नियोजन पीक : केळी

देशाच्या उत्तर भागातून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पुन्हा दक्षिणेकडे परतीचा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यासह पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. हवेली तालुक्यातील कोथरूड, खडकवासला, खेड, भोसरी, कळस, हडपसर, मुळशीतील माले, मुठे, भोरमधील भोर, भोलावडे, नसरापूर, किकवी, वेळू, आंबवडे, संगमनेर, निगुडघर. मावळमधील लोणावळा भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. वेल्ह्यातील पानशेत परिसरात २० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली असून, वेल्हा, विंझर, आंबवणे भागात तुरळक सरी पडल्या.

Weather Update
Crop Damage : पाच जिल्ह्यांत परतीच्या पावसाचा जोर कायम

जुन्नरमधील नारायणगाव येथे ४६.८ मिलिमीटर पाऊस पडला असून, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, राजूर, डिंगोरे, आपटाळे, ओतूर या भागांत हलक्या सरी पडल्या. खेडमधील वाडा, राजगुरुनगर, कुडे, पाईट, चाकण, कडूस आंबेगावमधील घोडेगाव, आंबेगाव, कळंब, पारगाव, मंचर शिरूरमधील टाकळी, वडगाव, न्हावरा, मलठण, तळेगाव, रांजणगाव, कोरेगाव, पाबळ, शिरूर भागातही तुरळक सरी बरसल्या.

Weather Update
Crop Loan : पीककर्ज उद्दिष्टपूर्ती अपूर्ण

बारामतीतील वडगाव २७.८, मोरगाव २०.० मिलिमीटर पाऊस पडला असून बारामती, माळेगाव, पणदरे, सुपा, उंडवडी भागात बऱ्यापैकी पाऊस पडला. इंदापुरातील निमगाव २०.०, अंथुर्णे ३३.८ मिलिमीटर, तर भिगवण, इंदापूर, लोणी, बावडा, काटी, सणसर. दौंडमधील देऊळगाव, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, रावणगाव, दौंड. पुरंदरमधील सासवड, भिवंडी, कुंभारवळण, जेजुरी, परिंचे, राजेवाडी, वाल्हा परिसरात हलक्या सरी बरसल्या.

इंदापुरातील काटी येथील शेतीनिष्ठ शेतकरी साहेबराव मोहिते म्हणाले, की काटी, वरकुटे, निमगाव केतकी परिसरामध्ये शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात मक्याचे पीक घेतो. यंदाही मक्याची पीक जोमात आले होते; मात्र सातत्याने पडणारा पाऊस यामुळे मका उत्पन्नावर गंभीर परिणाम झालेला आहे.

पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतातील कोणतेही पीक शेतातून बाहेर काढता येत नाही. तसेच शेतीची मशागत करता येत नाही. शासनाच्या माध्यमातून ज्या मका उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे. त्यांचे सर्वच पंचनामे करून, शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याची भूमिका शासनाने करावी.

ऊस तोडणीसाठी मोठी अडचण

बहुतेक साखर कारखाने सुरू झाले आहेत. मात्र या पावसाने ऊस तोडणीसाठी मोठी अडचण निर्माण झालेली आहे. बाहेरच्या तालुक्यातील ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला नोंद केला आहे. त्यांच्या उसाचे पुढील काही दिवसात, असाच पाऊस राहिला तर काय होणार, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

- खरिपात १,९५,७१० हेक्टरपैकी १,९६,३१५ हेक्टरवर पेरणी

- सातत्याने होत असलेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत

- ज्वारी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन कापूस, कांदा, भाजीपाला पिकांचे नुकसान

- पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com