औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांत बुधवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत परतीच्या पावसाचा जोर (Rain Intensity) कायम आहे. बीड व लातूर जिल्ह्यांत पावसाचा जोर (Marathwada Rain Update) राहिला. बीडमधील सहा व लातूर व उस्मानाबादमधील एका मंडलात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसाने या पावसाने खरिपातील काढणीला (Kharif Crop Harvesting) आलेल्या पावसाचा खेळ मांडला असून, पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा (Natural Calamity) सामना करावा लागत असल्याची स्थिती आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ४० मंडलांत तुरळक, हलका, मध्यम पाउस झाला. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात पावसाचा थेंबही बरसला नाही. परंतु इतर तालुक्यांमध्ये पावसाची हजेरी कमी अधिक प्रमाणात राहिली. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी एका मंडलाचा अपवाद वगळता ४८ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम पाउस झाला.
भोकरदन तालुक्यात पावसाचा जोर थोडा अधिक होता. बीड जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावणारा पाउस तुरळक, हलका, मध्यम, दमदार ते जोरदार स्वरूपाचा राहिला. जिल्ह्यातील बीड व गेवराई तालुक्यांतील प्रत्येकी दोन व माजलगाव तसेच परळी तालुक्यातील प्रत्येकी एका मंडलात अतिवृष्टी झाली. लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ३९ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम पाउस झाला.
अहमदपूर तालुक्यातील एका मंडलात अतिवृष्टी झाली. शिरूर अनंतपाळ तालुक्यात पावसाचा टिपूसही बरसला नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३५ मंडलांत पावसाची तुरळक, हलकी, मध्यम ते दमदार हजेरी लागली. जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील एका मंडलात अतिवृष्टी झाली.
जिल्हानिहाय पावसाची मंडल
(पाऊस मिलिमिटरमध्ये)
औरंगाबाद जिल्हा
कंचनवाडी १७.५, लोहगाव २१.५, सिद्धनाथ वडगाव १७.८, डोणगाव १६.८, बाजार सावंगी १५, सिल्लोड ३०.५, भराडी ३०.५, गोळेगाव १८.३, आळंद १६.८, वडोद बाजार १६.८
जालना जिल्हा
धावडा ५३.५, अनवा ४६.३, हसनाबाद १५.३, राजूर ३६.५, केदारखेडा ३७.५, टेंभुर्णी १५, रामनगर १९.८, श्रीष्टी १६.५, दाभाडी २१.८, बावने पांगरी २२
बीड जिल्हा
बीड १८.५, पाली ३३.५, मस्साजवळा ३४, नाळवंडी ४८.८, पिंपळनेर २४.८, पेंडगाव ४२.८, चौसाळा ३२, दासखेड ३९.८, अमळनेर १८, आष्टी ३८.८, कडा ३८.८, धानोरा २३.३, जातेगाव १८.३, पाचेगाव ३१, सिरसदेवी ३९.५, माजलगाव ५०.३, गंगामसला १६.८, तालखेड २२.८, नित्रुड २०.८, दिंद्रुड २२, अंबाजोगाई २०.५, लोखंडी सावरगाव २१, बर्दापूर ४३, हनुमंत पिंपरी १६.३, विडा १६.३, नांदूरघाट ३६.८, मुखेड २७.५, रायमोहा ३३.५
लातूर जिल्हा
मुरुड १५.३, किनगाव १४.५, चाकूर १५.५, वडवळ १५.५, पळशी २२.८
उस्मानाबाद जिल्हा
ढोकी ३३, तेर १६.८, तुळजापूर ४४, मंगरूळ १६, परांडा ३६.८, असू १८.३, जवळा २६, अनाळा ४३.८, अंभी ३५.५, माणकेश्वर २४.८, गोम २४.८, वालवड ३८,इट ३२.३, ईटकुर २७.५, येरमाळा १७.८, शिराढोण २४.५, वाशी १८.३
जिल्हानिहाय अतिवृष्टीची मंडल (पाऊस मिलिमीटरमध्ये)
बीड जिल्हा
मांजरसुंभा ७१.८
नेकनूर ७१.८
गेवराई ६६
मादळमोही ६६
धर्मापुरी ६६.८
लातूर जिल्हा
अहमदपूर ७०.८
उस्मानाबाद जिल्हा
सोनारी ६८.३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.