Integrated Farming: व्यावसायिक-एकात्मिक शेती पद्धतीत ‘यश’

Agriculture Success Story: अकोला जिल्ह्यातील हिंगणी बुद्रुक येथील यश नराजे हा तेवीस वर्षीय कृषी व पशुवैद्यक क्षेत्रातील शैक्षणिक ज्ञानाचा वापर करून केळी, पपई व कलिंगड वर्गीय पिकांच्या शेतीत आत्मविश्‍वासपूर्वक व दमदार वाटचाल करतो आहे. जोडीला करार पद्धतीने पोल्ट्रीमध्येही चांगले पाय रोवलेला यश अन्य युवकांसाठी आदर्श ठरतो आहे.
Yash Naraje and their Farm
Yash Naraje and their FarmAgrowon
Published on
Updated on

Modern Agriculture : अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील हिंगणी बुद्रुक हे प्रयोगशील गाव म्हणून समोर आले आहे. येथील क्षेत्र बागायती असून बहुतांश शेतकरी केळी, पपई, हंगामी पिके घेतात. या व्यावसायिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलले आहे. हवामान बदलाच्या काळात शेतकरी विविध पीकपद्धती अंगीकारत असल्याने त्याचा फायदा दिसत आहे. याच गावातील यश संतोषराव नराजे हा तेवीस वर्षीय तरुण वडील संतोषराव यांच्या मार्गदर्शनाखाली घरची २२ एकर शेती आत्मविश्‍वासपूर्वक व समर्थपणे सांभाळतो आहे. त्याने पशुविज्ञान विषयात पदवी घेतली. त्यानंतर आता कृषी विषयात द्वितीय विषयाला तो शिकतो आहे.

...अशी आहे व्यावसायिक शेती

यशला शेतीचा सुमारे सहा वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. आपल्या हाती सूत्रे घेतल्यानंतर फळबाग, हंगामी पिके घेण्यास त्याने प्राधान्य दिले. केळी व पपई ही त्याची मुख्य पिके आहेत. कलिंगड अधिक केळी आणि खरबूज अधिक पपई अशीही पद्धती देखील तो दरवर्षी राबवतो. दोन एकरांत कांदा बीजोत्पादन असते. बाकी कपाशी, सोयाबीन, तूर ही पिके असतातच. हिंगणी बुद्रुक गाव केळी उत्पादनात अग्रेसर झाले आहे. सिंचनाच्या सुविधा असल्याने प्रत्येक शेतकऱ्याकडे केळी असते. यशनेही केळी लागवडीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आंतरपिकांमधून मुख्य पिकाचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यात चांगले यश मिळते आहे.

Yash Naraje and their Farm
Agriculture Success Story: शेतीतील नवा प्रयोगशील मार्गदर्शक: अभिजित घुले यांची यशोगाथा

केळी व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी

सात बाय पाच फुटांवर केळीची लागवड करताना प्रति झाडास ३५ चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली आहे. तर ७० बाय ३० हा ‘पॅटर्न’ तयार केला आहे. यात ७० टक्के जागा केळी झाडांसाठी दिली जाते. त्यामुळे झाडाचा सर्वांगीण विकास होतो. तर शेतात काम करण्यासाठी ३० टक्के जागा उपलब्ध राहते. ही पद्धत वापरल्यामुळे व्यवस्थापन सोपे झाले असून, त्यातून उत्पादनात वाढ झालेली दिसून आल्याचे यश सांगतो.

फुलकिडीचा त्रास कमी करण्यासाठी यशने माती फवारणीचे तंत्र वापरले आहे. आपल्या पडीक शेतात चार फुटांचा खोल खड्डा करून त्यातून पाच किलो माती प्रति दोनशे लिटर पाणी असे मिश्रण तयार करून ते दोन दिवस भिजत ठेवले जाते. काही प्रमाणात गाळून पंपाच्या साह्याने या मातीची फवारणी झाडांवर केली जाते. त्यामुळे मातीचा एक थर झाडांवर तयार होतो. त्यामुळे फुलकिडीसाख्या किडींना डंख मारणे अशक्य होते व त्यांचा प्रादुर्भाव होत नाही असे यश सांगतो.

उन्हाळ्यात केळीचे संरक्षण करताना पॉलिथिन रुपी क्रॉप कव्हरच्या ऐवजी बोरू किंवा धैंचासारख्या पिकांची लागवड बागेच्या सभोवती केली जाते. यामुळे केळी रोपांचे तीव्र उष्णतेपासून संरक्षण होते. केळी लागवडीच्या पंधरा दिवस आधी त्यात आंतरपीक म्हणून कलिंगडाची लागवड होते. एकरी २५ ते ३० टनांच्या दरम्यान कलिंगडाचे, तर केळीचेही २५ ते ३० टनांच्या दरम्यान उत्पादन मिळते. केळीला किलोला १० ते १३ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.

Yash Naraje and their Farm
Agriculture Success Story : प्रयोगशील शेतीमुळे नाईक बनले आदर्श शेतकरी

पपई उत्पादनातही अव्वल

नराजे कुटुंबाचा पपई पिकातही काही वर्षांपासून हातखंडा तयार झाला आहे. एकरी ५० ते ६० टनांच्या दरम्यान उत्पादन मिळवले आहे. आत्तापर्यंत तैवान ७८६ वाणाची लागवड व्हायची. मात्र विषाणूजन्य. रोगाचा प्रादुर्भाव कमी होणाऱ्या १५ क्रमांकाच्या वाणाची यंदा लागवड केली आहे. पपईत पाच फुटी गादीवाफ्याचा (बेड) वापर असतो. त्यात आंतरपीक म्हणून खरबुजाचीही लागवड असते. त्याचे एकरी १२ टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे. पपईला किलोला १० ते १५ रुपयांपर्यंत दर मिळवला आहे. काही वेळा बुरशीजन्य रोग वा तत्सम कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांचे आपले प्लॉट सोडून देण्याची वेळ आली होती. अशाही परिस्थितीत उत्कृष्ट व्यवस्थापनातून यश यांनी कलिंगड, खरबुजाचे पीक यशस्वी केले.

शेतीतील यश

नराजे कुटुंबाने शेतीतील उत्पन्नाच्या बळावरच पाच एकर शेती २०२२ मध्ये विकत घेतली. तेल्हारा शहरात प्लॉट घेतला. घराचे बांधकाम केले. ट्रॅक्टर घेतले. कुटुंबाची आर्थिक स्थिती सक्षम केली. वडिलांसह आई अनिता यांचे मार्गदर्शन मिळते. भाऊ अक्षय मेकॅनिकल इंजिनिअर तर भाऊ ऋषिकेश एमबीबीएस झाले आहेत. अशा रीतीने घराला उच्चशिक्षणाचा वारसा लाभला आहे. तालुका कृषी विभागाचे कुटुंबाला विविध योजनांच्या रूपाने सातत्याने साह्य मिळते. शेतीतूनच नराजे कुटुंबाने जिल्ह्यात आपली ठळक ओळख निर्माण झाली आहे.

कुक्कुटपालन ठरतेय आधारभूत

पशुवैद्यकीय पदवी घेतलेल्या यशने पाच वर्षांपूर्वी करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसायही सुरू केला आहे. सुमारे साडेसहा हजार पक्ष्यांचे संगोपन केले जात आहे. त्यासाठी १५ लाखांची गुंतवणूक केली आहे. सुमारे ६५ दिवसांची बॅच असते. संबंधित कंपनी लहान पिल्ले पुरवते. पक्षी अडीच किलो किंवा त्यापेक्षा अधिक वजनाचा झाल्यानंतर कंपनी पक्षी विकत घेते. त्यास प्रति किलो ८० ते १२० रुपयांच्या दरम्यान दर मिळतो. काहीवेळा दर त्याहून खाली येतो. या व्यवसायाने शेतीला चांगल्या उत्पन्नाचा आधार दिला आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाळ्यात तापमान प्रचंड राहते. अशा स्थितीत शेडमध्ये फॉगर्स, कुलर यांचा वापर केला जातो. शेडच्या अवतीभोवती पिके घेऊन उन्हाच्या झळा कमी केल्या आहेत.

यश नराजे, ९१५८६३७९३८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com