खोडवा उसात सुमारे ७०% जागा सुरुवातीला मोकळी असते. आंतरपिकामुळे जमीन पूर्ण वापरात येते आणि नफा वाढतो.
तण नियंत्रण होते आणि जमिनीचा पोत सुधारतो. नत्र स्थिरीकरण होऊन उसाचा खर्च कमी होतो.
खोडव्याचे फुटवे पसरायला ३–४ महिने लागतात. तोपर्यंत दोन सरींतील जागा आंतरपिकासाठी योग्य असते.
कांदा, भेंडी, चवळी, गवार, पालक, मेथी, कोथिंबीर घ्यावी. एका उसामागे २ ते ३ ओळी (१:२ किंवा १:३) लावाव्यात.
भुईमूग, सूर्यफूल ही तेलबिया फायदेशीर ठरतात. गाजर, मुळा, लालबीट १:१ किंवा १:२ प्रमाणात घ्यावीत.
टरबूज, कलिंगड, काकडी, दोडका आंतरपीक म्हणून घेता येतात.वेल उसात चढू देऊ नका, मधल्या जागेत सावरून ठेवा.
ताग, धैंचा, चवळी ही हिरवळीची खते उपयुक्त आहेत. यामुळे जमिनीची सुपीकता वाढते व पुढील उसाला फायदा होतो.
आंतरपीक ७०–९० दिवसांत काढणीस येणारे निवडा. पाणी, खत व प्रकाशासाठी उसाशी स्पर्धा होणार नाही याची काळजी घ्या.