Swarali Pawar
उन्हाळी मूग घेतल्याने खरीप हंगामासाठी हातात पैसे तयार होतात. मूगामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि नत्राचे प्रमाण वाढते.
मूग पीक उष्ण हवामानात चांगले वाढते. २१ ते ३५ अंश तापमानात उन्हाळी मूग भरघोस उत्पादन देतो.
मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य ठरते. चोपण, पाणथळ व क्षारयुक्त जमिनीत मूग घेऊ नये.
एक खोल नांगरट करून हॅरो किंवा वखर चालवावी. कुळवाच्या १–२ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
उन्हाळी मूगाची पेरणी फार उशिरा करू नये. २० फेब्रुवारी ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी फायदेशीर ठरते.
हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे वापरावे. ओळींतील अंतर ३० सें.मी. व रोपांतील अंतर १० सें.मी. ठेवावे.
बीजप्रक्रियेमुळे उगवण चांगली होते व रोगांचा धोका कमी होतो. थायरम-कार्बेन्डाझिम किंवा ट्रायकोडर्मा वापरणे फायदेशीर ठरते.
रायझोबियम व पीएसबी जीवाणूंमुळे मुळांवर गाठी तयार होतात. यामुळे पिकाला नत्र मिळते आणि उत्पादनात लक्षणीय वाढ होते.