Maharashtra Stormy Rain: राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज कायम

Heavy Rainfall Update: राज्यात पूर्वमोसमी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असून, तापमानातही मोठी घट झाली आहे.
Stormy Rain
Stormy RainAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्याच्या काही जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाचा तडाखा सुरूच आहे. ढगाळ आकाश, पावसाची हजेरी यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. आज (ता. १६) राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

‎गुजरात आणि परिसरावर आणि उत्तर कर्नाटकात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यात पूर्वमोसमी वादळी पावसाचे सावट कायम आहे. कोकणातील पालघर, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, मराठवाड्यातील लातूर, तसेच विदर्भातील वर्धा, अकोला जिल्ह्यांत विविध ठिकाणी पावसाची नोंद झाली. विदर्भात उन्हाचा चटका अधिक असल्याने पारा अद्यापही चाळीशीपार आहे.

Stormy Rain
Monsoon 2025: माॅन्सूनची आज अरबी समुद्रापर्यंत मजल

गुरुवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४१.४ अंश तापमानाची नोंद झाली. अमरावती आणि ‎नागपूर येथे ४१ अंश, ‎वर्धा, ‎अकोला, ‎‎भंडारा येथे ४० अंशांपेक्षा अधिक, तर ‎‎‎‎धुळे, चंद्रपूर आणि ‎गोंदिया येथे ३९ अंशांपेक्षा अधिक, तसेच गडचिरोली व ‎यवतमाळ येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १६) संपूर्ण विदर्भासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

गुरुवारी (ता. १५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३५.७---२३.८

अहिल्यानगर---निरंक---२३.३

‎‎धुळे---३९.०---२१.५

‎जळगाव---३६.७---२५.६

‎जेऊर---३२.५---२१.५

‎कोल्हापूर---३३.६---२३.९

‎महाबळेश्वर---२४.८---१७.८

Stormy Rain
Pune Heavy Rain: लव्हळ्यात सर्वाधिक ४८.५ मिमी पाऊस

‎मालेगाव---३३.८---२४.४

‎नाशिक---३२.५---२३.५

‎निफाड---३५.३---२२.०

‎सांगली---३३.२---२३.६

‎सातारा---३५.२---२३.५

‎सोलापूर---३३.३---२५.१

‎सांताक्रूझ---३४.६---२६.०

डहाणू---३४.६---२५.६

‎रत्नागिरी---३४.५---२५.५

‎छत्रपती संभाजीनगर---३१.२---२५.४

‎धाराशिव---३३.१---२०.८

‎परभणी---३६.८---२६.७

‎परभणी (कृषी)---३५.१---२५.५

‎अकोला---४०.६---२५.७

अमरावती---४१.०---२५.५

‎‎भंडारा---४०.०---२७.०

‎बुलडाणा---३४.७---२६.०

‎ब्रह्मपुरी---४१.४---२७.४

‎चंद्रपूर---३९.२---२६.८

‎गडचिरोली---३८.०---२५.४

‎गोंदिया---३९.६---२७.२

‎नागपूर---४१.०---२९.२

‎वर्धा---४०.९---२४.०

‎वाशीम---३७.८---निरंक

‎यवतमाळ---३८.६---२६.४

वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

कोकण : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा

सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : बीड, धाराशिव, लातूर.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

‎४० अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

‎ब्रह्मपुरी ४१.४, अमरावती ४१, ‎नागपूर ४१, ‎वर्धा ४०.९, ‎अकोला ४०.६, ‎‎भंडारा ४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com