Pune Heavy Rain: लव्हळ्यात सर्वाधिक ४८.५ मिमी पाऊस

Agricultural Loss: मॉन्सूनपूर्व पावसाने पुणे जिल्ह्यात दमदार हजेरी लावत वातावरणात गारवा आणला असला, तरी आंबेगाव, मुळशी, वेल्हा भागांतील शेतकऱ्यांचे बाजरी, कांदा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Rain Crop Damage
Rain Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे जिल्ह्यात विविध भागांत मॉन्सूनपूर्व पावसाने चांगलीच दाणादाण उडवली आहे. अनेक ठिकाणी मंगळवारी सकाळी व रात्री हवेली, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांत दमदार पाऊस झाला. बुधवारी (ता. १४) सकाळी आठपर्यंत मुळशीतील लव्हळे येथे सर्वाधिक ४८.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे बाजरी, कांदा, आंबा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याची मागणी जोर धरू लागली आहे.  

सध्या जिल्ह्यात उन्हाळी कांदा पिकाची काढणी अंतिम टप्प्यात सुरू आहे. तर बाजरी पिकेही काढणीच्या अवस्थेत आहेत. परंतु मागील आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडत आहे. हवेली तालुक्यात मंगळवारी (ता. १३) रात्री पुणे शहर व उपनगरात जोरदार पाऊस झाला. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी भागांत भात रोपांच्या कामांना वेग येऊ लागला आहे. आंबेगाव तालुक्यात विविध गावांमध्ये एक तास पडलेल्या मुसळधार मॉन्सूनपूर्व पावसामुळे काढणीला आलेले बाजरी पीक शेतात जमीनदोस्त झाले. तसेच शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. तालुक्यात मंचर,

Rain Crop Damage
Pre-Monsoon Rain: नाशिक जिल्ह्यात पावसाचे थैमान

घोडेगाव, कळंब, महाळुंगे पडवळ, रांजणी अवसरी, गावडेवाडी, मेंगडेवाडी, लाखनगाव, देवगाव, काठापूर, पारगाव, निरगुडसर इत्यादी गावांत उन्हाळी बाजरीची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात.  सध्या उन्हाळी बाजरी काढणीला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकन्यांनी सातशे ते आठशे रुपये देऊन बाहेर गावाहून मजूर बाजरी काढणीला बोलावले असून अनेक शेतकऱ्यांनी शेतातच बाजरी काढून ठेवली आहे. शेतातील बाजरी पावसाने भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

तसेच विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उन्हाळी उत्पादन घेतले जात आहे. कांदा काढणी अंतिम टप्प्यात आली असून अनेक शेतकऱ्यांनी शेतातच कांदा ठेवला आहे. परंतु सोमवारी (ता. १२) झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. आंबेगाव तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Rain Crop Damage
Monsoon 2025: राज्यात पुढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज

मोठ्या प्रमाणात वातावरणातील वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते. जोरदार पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पेरणी पूर्व मशागतीच्या कामांसाठी पाऊस फायदेशीर ठरणार आहे. यावर्षी मॉन्सूनपूर्व पाऊस वेळेवर सुरू झाल्याने पेरण्या वेळेवर होतील, अशी अशा शेतकऱ्यांना आहे. नदीकाठच्या गावातील बागायती पिकांनाही या पावसाचा फायदा होणार आहे.

घरात पाणी शिरले

मुसळधार पावसामुळे अवसरी बुद्रुक येथील अश्विनी राजगुरू यांच्या राहत्या घरात पाणी शिरल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

बुधवारी (ता. १४) सकाळी आठपर्यंत पडलेला पाऊस (मिमी)

हवामान केंद्र पडलेला पाऊस

लव्हळे ४८.५

राजगुरूनगर ३४.५

डुडूळगाव २२.५

शिवाजीनगर १८.७

पाषाण १७.१

भोर १४.५

माळीण १४.०

एनडीए ८.०

चिंचवड ७.०

लोणावळा ३.५

हडपसर ३.०

कोरेगाव पार्क २.०

वडगावशेरी १.५

हवेली १.०

मगरपट्टा ०.५

तळेगाव ०.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com