Monsoon 2025: माॅन्सूनची आज अरबी समुद्रापर्यंत मजल

माॅन्सूनने आज अरबी समुद्रापर्यंत मजल मारली. श्रीलंकेच्या किनाऱ्यापर्यंत माॅन्सून पोचला आहे. तसेच माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान कायम आहे. त्यामुळे माॅन्सून पुढील ४ दिवसांमध्ये आणखी पुढे सरकेल. तर राज्यात पुढील ५ दिवस वादळी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

पोषक हवामान असल्याने माॅन्सूनने आज आणखी काही भागात प्रगती केली. माॅन्सूनने आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीव आणि कोमोरिनचा भाग तसेच दक्षिण बंगालच्या उपसागरचा आणखी काही भाग तसेच अंदमान आणि अंदमान समुद्राच्या आणखी काही भागात माॅन्सूनने प्रगती केली. माॅन्सून आता श्रीलंकेच्या किनाऱ्यापर्यंत पोचला आहे. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवसांत माॅन्सून दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, मालदीव आणि कोमोरीनचा भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमानाच उर्वरित भाग आणि मध्य बंगालच्या उपसागराचा उरलेला भाग माॅन्सून काबीज करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसासाठी पोषक हवामान आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर जिल्ह्यात काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या वादळी पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com