Onion Sowing Machine: कांदा रोपवाटिकेत बियाणे पेरणीसाठी यंत्र विकसित

Agricultural Mechanization: चांदवड (नाशिक) येथील पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांनी कांदा बियाणे पेरणी व मातीमध्ये मिसळणीसाठी बॅटरीवर चालणारे अत्याधुनिक यंत्र विकसित केले आहे. या यंत्राने शेतकऱ्यांची पेरणीची प्रक्रिया अधिक सोपी, अचूक व खर्चिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.
Agriculture Innovation
Agriculture InnovationAgrowon
Published on
Updated on

Agriculture Technology: चांदवड (जि. नाशिक) येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम शिक्षण संस्थेच्या श्री. हिरालाल हस्तिमल (जैन बंधू, जळगाव) पॉलिटेक्निकमधील यंत्र अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बॅटरीचलित कांदा बियाणे पेरणी करून ते व्यवस्थित मातीत मिसळण्यासाठी यंत्र (ओनियन सीड सोईंग अँड मिक्सिंग मशिन) विकसित केले आहे. हे यंत्र वाफ्यात कांदा बियाणे पेरणी करण्यासाठी इलेक्ट्रिक कार्टसारखे चालवले जाते.

ना शिक हे कांदा उत्पादनाचे प्रमुख आगार असून, चांदवड तालुक्यात खरीप, लेट खरीप व उन्हाळी अशा तीनही हंगामांत कांदा उत्पादन घेतले जाते. पारंपरिक पद्धतीने कांदा रोपांची निर्मिती करण्यासाठी शेतकरी बियाणे फोकून टाकून ते मातीआड करण्यासाठी लोखंडी पंज्याचा वापर करतात. यात सुलभता आणण्यासाठी श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम शिक्षण संस्थेच्या श्री. हिरालाल हस्तिमल (जैन बंधू, जळगाव) पॉलिटेक्निकमधील यंत्र अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी सुमीत देवरे,

Agriculture Innovation
Agriculture Technology: तंत्रज्ञान विकासातून यंत्रामध्ये होणारे बदल

साहिल मन्सूरी, रितेश भामरे, उमेश जाधव हे पुढे सरसावले. त्यांनी शेतकऱ्यांची कामाची पद्धत, स्थानिक गरज व उपयुक्तता अभ्यासून बॅटरीचलित कांदा बियाणे पेरणी व मातीमध्ये मिसळणीचे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राच्या पुढील बाजूने कांदा बियाणे हे वाफ्यामध्ये एकसारखे पसरवले जाते व त्यानंतर ते बियाणे मातीत मिसळले जाते.

चांदवड कांदा उत्पादक पट्ट्यामधील शेतकरी कुटुंबातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची समस्या दूर करण्यासाठी प्रा. अल्केश अजमेरा यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्मिती केली आहे. या वैशिष्ट्यपूर्ण यंत्र निर्मितीसाठी त्यांना २ महिन्यांचा कालावधी लागला असून, ३५ हजार रुपये खर्च आला आहे.

Agriculture Innovation
Agriculture Technology: शेतजमिनीच्या प्रभावी विकासासाठी आधुनिक यंत्रे

कॅपस्टन प्रोजेक्ट प्लॅनिंग या विषयाअंतर्गत ‘ओनियन सीड सोईंग अँड मिक्सिंग शिन’ या प्रकल्पाला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथे झालेल्या ‘डिपेक्स २०२५’ या राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये सहभागी ३२४ प्रकल्पांतून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या यंत्राचे पेटंटची नोंदणी झाली असून, ते व्यावसायिकदृष्ट्या बाजारात आणण्याचा मानस आहे.

विश्‍वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, देवस्थान समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनचे समन्वयक अरविंद कुमार बनसोडे, तंत्रनिकेतनचे मुख्य समन्वयक व व्यवस्थापन समिती सदस्य राजेंद्र कुमार बंब, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. वानखेडे, यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. डी. व्ही. लोहार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

उमेश जाधव (विद्यार्थी) ७४९८६५२०३७

प्रा. अल्केश अजमेरा ९४२२३२२५७

...असे आहे यंत्र

पेरणी करताना कांदा बियाणे योग्य अंतरावर आणि खोलीवर पेरणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांची उगवण व मुळांची वाढ योग्य प्रकारे होते. त्या उद्देशाने ‘इलेक्ट्रिक कार्ट’ प्रमाणे तयार केलेले यंत्र वाफ्यात डीसी मोटर आणि ४८ व्होल्ट बॅटरीवर चालते. यंत्र चालविण्यासाठी स्टिअरिंग उपलब्ध केले आहे. यंत्राच्या पुढील बाजूला कांदा बियाणे ठेवण्यासाठी सोय केली आहे. बियाणे सम प्रमाणात जमिनीवर सोडण्यासाठी स्वयंचलित जाळीचा वापर केला आहे. त्या मागे यंत्राला पाते जोडलेले असून, त्याद्वारे माती हलकेच सपाट करत बियाणे मातीमध्ये मिसळले जाते.

फायदे

 फोकून बियाणे टाकण्याच्या तुलनेमध्ये बियाणे कमी लागते.

 बियाण्यांची पेरणी योग्य अंतरावर व खोलीवर होत असल्याने उगवण व पुढील वाढ चांगली होते.

 यंत्र वापरणे सोपे असून, वेगाने काम होते. ४ तासांत एक एकर क्षेत्रावर पेरणी शक्य.

 देखभाल व चालविण्याचा खर्च कमी येतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com