Sugarcane Management: आडसाली उसासाठी व्यवस्थापन गरजेचे

Dr. Sandeep Ghole: डॉ. संदीप घोले यांनी आडसाली ऊसाचे उत्पादन पारंपरिक पद्धतीने न घेता योग्य व्यवस्थापन आणि सेंद्रिय दृष्टिकोनातून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. 'ॲग्रोवन'च्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त पारगाव येथे झालेल्या परिसंवादात त्यांनी हा सल्ला दिला.
Dr. Sandeep Ghole
Dr. Sandeep GholeAgrowon
Published on
Updated on

Pune News: ‘‘आडसाली उसाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पीक न घेता योग्य व्यवस्थापन तसेच उपयोजन करणे गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन ऊस, कांदा तज्ज्ञ डॉ. संदीप घोले यांनी केले.

पारगाव (ता. दौंड) येथे ‘सकाळ ॲग्रोवन’ व संदीप प्याज कंपनीच्या वतीने ‘ॲग्रोवन’च्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित शेतकरी परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी घोले म्हणाले की, ऊस लागवड करताना माती परीक्षण, खत व्यवस्थापन, उच्च दर्जाचे बियाणे तसेच दोन सरींमध्ये साडेचार फुटाचे अंतर असावे. फवारणी करताना वातावरण महत्त्वाचे असते. कंपोस्ट खताचा वापर करावा. वरील पद्धत अवलंबल्यास एकरी सरासरी चांगले उत्पन्न घेता येऊ शकते.

Dr. Sandeep Ghole
Sugarcane Water Management: उसातील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजना

कार्यक्रमात ‘ॲग्रोवन’ व संदीप प्याज कंपनीच्या वतीने संतोष बोत्रे, अजित शेळके, अमित ताकवणे, ईश्वर ताकवणे, सुनील ताकवणे, विकास कुदळे, संतोष कुल, शरद शिंदे, नाना वडघुले, मनोहर गरदरे, भरत लोले, मच्छिंद्र लोले, राजाराम शितोळे, चंद्रहार देवकर, भानुदास गायकवाड, किरण गवारे, शिवाजी काटे, पांडुरंग लोणकर, विनोद मोरे व कौस्तुभ भागवत यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Dr. Sandeep Ghole
Sugarcane Management : उसाची बाळबांधणी करा योग्य वेळेला

दरम्यान, संदीप सांगळे यांचे शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाला पारगाव सोसायटीचे अध्यक्ष मच्छिंद्र ताकवणे, उपाध्यक्ष चैत्राली काळे, भीमा पाटसचे संचालक तुकाराम ताकवणे, बाजार समितीचे संचालक पोपटराव ताकवणे, सर्जेराव जेधे, श्‍यामराव ताकवणे, दशरथ गरदडे, लक्ष्मण ताकवणे, राजेश थोरात, विजय काळे, कृषी पर्यवेक्षक राजू पवार, कृषी सहाय्यक अजित फराटे, राजेंद्र वनवे, बाळासाहेब चौधरी, निवृत्ती ताकवणे, अशोक शेलार, दीपक रोडे आदी उपस्थित होते. ‘ॲग्रोवन’चे वितरण प्रतिनिधी महेश चौखंडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

‘ॲग्रोवन’ सर्वोत्कृष्ट व्यासपीठ

गेल्या २० वर्षांपासून आम्ही सकाळ बरोबरच ‘ॲग्रोवन’चे वाचक आहोत. ‘ॲग्रोवन’ने सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिशा देण्याचे काम केले. सर्वसामान्य शेतकऱ्यांची यशोगाथा मांडण्याचे ‘ॲग्रोवन’ हे सर्वोत्कृष्ट व्यासपीठ आहे. याशिवाय आमच्या भावना वेळोवेळी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम दैनिकाने केले. वर्धापन दिनानिमित्त पारगाव येथे दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन केले. त्याबद्दल ‘ॲग्रोवन’चे आभार, अशी भावना ‘भीमा-पाटस’चे संचालक तुकाराम ताकवणे व पारगाव सोसायटीचे अध्यक्ष मच्छिंद्र ताकवणे व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com