
यशवंत जगदाळे
Agriculture Technology: ॲक्वापोनिक्स तंत्रज्ञानामध्ये मासे आणि वनस्पतींचे एकत्रित संवर्धन केले जाते. यामध्ये माशांचा पाण्यातील जीवनक्रम आणि वनस्पतींची वाढ एकमेकांच्या साह्याने होते. यामध्ये दोन्ही प्रणाली एकमेकांमध्ये साह्य करतात, ज्यामुळे प्रत्येकाला अधिकाधिक पोषण मिळवता येते.
या तंत्रामध्ये वनस्पती आणि मासे एकत्रितपणे एकात्मिक पद्धतीने वाढवले जातात. माशांच्या विष्ठेचा वापर वनस्पतींच्या पोषणासाठी होतो. वनस्पती पाण्याची शुद्ध राखण्यासाठी मदत करतात.
तंत्रज्ञानाचे फायदे
पारंपरिक शेतीच्या तुलनेत या प्रणालीमध्ये पाणी वापर खूप कमी होतो. कारण या तंत्रज्ञानामध्ये पाण्याचा पुनर्वापर होतो.
या प्रणालीमध्ये रासायनिक खतांची आवश्यकता नाही, कारण माशांच्या विष्ठेमुळे वनस्पतींचे पोषण होते.
या तंत्रामध्ये कमीत कमी जागेत अधिक उत्पादन मिळवता येते.
माशांमुळे वनस्पतींना आवश्यक पोषक तत्त्व उपलब्ध होते. वनस्पतींमुळे पाणी स्वच्छ राहते.
तंत्रज्ञान प्रणालीचे मुख्य घटक
मासे : माशांच्या उत्सर्जनातून पाण्यामध्ये अमोनिया आणि नायट्रेट या सारखी पोषक द्रव्ये उपलब्ध होतात. ही पोषकद्रव्ये वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात.
बायोफिल्टर : पाण्यातील गंध, विषारी रासायनिक पदार्थ आणि अमोनिया यांचे रूपांतर करण्यासाठी एक बायोफिल्टर लागतो. या फिल्टरमध्ये विशिष्ट जिवाणू असतात, जे अमोनियाचे नायट्रेट्समध्ये रूपांतर करतात, जे वनस्पतींना आवश्यक असते.
वनस्पती : वनस्पती वाढीसाठी पोषणयुक्त पाणी शोषून घेतात, यामुळे वनस्पतींची वाढ होते. तसेच तंत्रज्ञानामुळे माशांना देखील आवश्यक शुद्ध पाणी उपलब्ध होते.
यशवंत जगदाळे ९६२३३८४२८७
(भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.