Koyna Dam : गाळामुळे कोयना वीज प्रकल्पाच्या चौथा टप्प्याचा गुदमरतोय श्वास

Koyna Power Project : जून महिन्याच्या शेवटपर्यंत माॅन्सूनचा पाऊस न पडल्याने कोयनेची पाणी पातळी प्रचंड खालावली होती. त्यामुळे वीज प्रकल्प बंद करण्याची नामुष्की ओढवली. पण धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे.
Koyna Dam
Koyna Damagrowon
Published on
Updated on

Koyna water level : माॅन्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातील पाण्याची खालावल्याने कोयना प्रकल्पातील सगळ्यात मोठा असलेल्या चौथ्या टप्प्यातील  वीजनिर्मिती बंद झाली आहे. दरम्यान, धरणातील गाळाने चारही बाजूने वेढलेल्या १ हजार मेगावॅट क्षमतेच्या वीज निर्मितीच्या चौथ्या टप्प्याचा श्वास गुदमरत आहे.

Koyna Dam
Koyna Dam : कोयना धरणातून विसर्ग बंद

जून महिना मध्यापर्यत राज्यात पावसाला अपेक्षित सुरुवात झाली नव्हती. त्याचा परिणाम महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाला जाणवू लागला. १०५ टीएमसी क्षमतेच्या धरणात सध्या स्थितीत फक्त ४.१६ टीएमसी पाणीसाठा असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. तसेच वीज प्रकल्पातील सगळ्यात मोठा असलेल्या चौथ्या संचातून वीजनिर्मिती बंद झाली. कोयना वीजप्रकल्पातून एकूण १,९६० मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते. त्यातील सगळ्यात महत्त्वाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील कोळकेवाडी येथील चौथ्या संचातून १ हजार मॅगावॉट वीजनिर्मिती होते.  

Koyna Dam
Koyna Dam : कोयनेचं धरणं आटलं !, पाण्याखाली गेलेली गावं पडली उघडी

 दोन वर्षांपूर्वी कोयना पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. त्यामुळे धरणात प्रचंड गाळ साठला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतो. या क्षेत्रात ६ हजार मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्यावर धरण पूर्ण भरते. मागील काही वर्षांत ५ हजार मिलीमीटर पावसानेसुद्धा धरण ओव्हरफ्लो होत आहे. कमी पर्जन्यमानात कोयना धरण लवकर भरणे, ही गाळाची किमया आहे.

वीज प्रकल्पाचा १ हजार मेगावॅट क्षमतेचा चौथा टप्पा गाळाने भरला आहे. या प्रकल्पाच्या अवतीभोवती 23 वर्षांमध्ये साचलेल्या गाळामुळे येथील यंत्रणेला गंज लागला आहे. गाळाने चारही बाजूने वेढलेल्या एक हजार मेगावॅट क्षमतेच्या चौथ्या टप्प्याचा श्वास गुदमरत आहे. त्यामुळे हा टप्पा तातडीने गाळमुक्त करा, असे पत्र महानिर्मिती कंपनीने जलसंपदा विभागाच्या कोयना प्रकल्प व्यवस्थापनाला दिले आहे. त्यानंतर चौथ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम यांत्रिकी विभाग व जलसंधारण विभागाने सुरू केले. पण दोन दिवसातच पावसाने दमदार हजेरी लावल्याने या कामाला ब्रेक लागला आहे. हे धरण गाळसंपदा बनले आहे. यासाठी धरणातील गाळाचे सर्वेक्षण केल्यानंतर तो गाळ काढल्यास हे धरण पुन्हा जलसंपदामय होईल.

धरणात 12 ते 14 क्‍युबिक मीटर गाळ असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे धरणाची साठवण क्षमता पाच ते सहा टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. गाळाचे सर्वेक्षण लवकरच करण्यात येणार आहे.–
एच. व्ही. गुणाले, मुख्य अभियंता, कोयना प्रकल्प.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com