Team Agrowon
माॅन्सूनचा पावसाने ओढ दिल्याने कोयना धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे
सध्या धरणामध्ये 11.74 टीएमसी म्हणजेच अवघे 11 टक्के पाणी शिल्लक राहिले आहे.
धरणातील जलायशाचे पात्र कोरडे पडायला लागला. त्यामुळे पाण्यात बुडालेली गावं उघडी पडायला लागली आहेत.
कोयना धरण क्षेत्रात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला असल्याने जलसाठा वाढलेला नाही. याचा परिणाम कोयना जलविद्युत प्रकल्पावर झाला आहे.
विसर्ग कमी केल्याने कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी कमी झाले आहे.
कोळकेवाडी येथील चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प झाली
नदीत पाणी कमी सोडल्याने नदीमधील पाणीपुरवठा योजना, उपसा सिंचन योजनांना पाणीपुरवठा कमी होत आहे.
गावाच्या दक्षिणेला वाहणाऱ्या गोदावरीचे पात्र उघडे पडल्यामुळे अनेक पुरातन मंदिरे उघडी पडली आहेत.