Agriculture Commodity Market : हळदीचे दर वाढण्याची शक्यता

Turmeric Rate : या सप्ताहात हळदीच्या किमतींनी उसळी घेतली. स्थानिक व निर्यात मागणी यावर्षी वाढती आहे. एक अंदाजानुसार यावर्षी हळदीच्या उत्पादनातसुद्धा वाढ अपेक्षित आहे; मात्र त्याविषयी खात्री नाही. उत्पादनासंबंधी उलट-सुलट वार्ता येत आहेत.
Turmeric Market
Turmeric Market Agrowon
Published on
Updated on

फ्युचर्स किमतीः सप्ताह- १५ ते २१ मार्च, २०२५

या सप्ताहात हळदीच्या किमतींनी उसळी घेतली. स्थानिक व निर्यात मागणी यावर्षी वाढती आहे. एक अंदाजानुसार यावर्षी हळदीच्या उत्पादनातसुद्धा वाढ अपेक्षित आहे; मात्र त्याविषयी खात्री नाही. उत्पादनासंबंधी उलट-सुलट वार्ता येत आहेत. त्यामुळे भावामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत आहेत. या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने स्पॉट किमतीत ९ टक्क्यांनी तर एप्रिल फ्युचर्स मध्ये १४ टक्क्यांनी वाढ झाली. स्पॉटच्या तुलनेने मे व जून फ्युचर्स भाव फारसे आकर्षक नाहीत. ते फक्त १ ते २ टक्क्यांनी अधिक आहेत. गेल्या तीन वर्षापेक्षा या वर्षी आवक कमी आहे. भाव वाढण्याशी शक्यता आहे.

कापूस आणि सोयाबीन या प्रमुख पिकांनी यंदा शेतकऱ्यांची निराशा केली. भारतातील सोयाबीन व कापूस यांच्या किमती जागतिक किमतीशी समांतर चढ-उतार दर्शवितात. यंदा हरभऱ्यातही उतरता कल आहे. कांद्याचेही दर पडल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. परंतु केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क रद्द करण्याचा निर्णय शनिवारी (ता. २२) घेतला. एक एप्रिलपासून निर्यातशुल्क रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे कांद्याच्या किमतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

१८ मार्च २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात ०.५ टक्क्याने वाढून रु. ५३,५६० वर आले आहेत. मे फ्युचर्स भाव रु. ५४,३१० वर आले आहेत. जुलै भाव रु. ५६,००० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ४.६ टक्क्यांनी अधिक आहेत.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात १ टक्क्याने वाढून रु. १,४३२ वर आले आहेत. एप्रिल फ्युचर्स रु. १,४५९ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स रु. १,५०४ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत. सध्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत.

मका

NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात १.५ टक्क्यांनी घसरून रु. २,२५५ वर आल्या आहेत. एप्रिल फ्युचर्स किमती १.७ टक्क्यांनी घसरून रु. २,२६७ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स रु. २,२९६ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.८ टक्क्यांनी अधिक आहे. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) अधिक आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) या सप्ताहात ८.९ टक्क्यांनी वाढून रु. १३,३३४ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती १४ टक्क्यांनी वाढून रु. १३,३९४ वर आल्या आहेत. मे किमती रु. १३,४८४ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.१ टक्क्याने अधिक आहेत.

Turmeric Market
Chana Threshing : खानदेशात हरभरा मळणी पूर्णत्वाकडे

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात ०.९ टक्क्यांनी वाढून रु. ५,७०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी वाढून रु. ५,७२५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० जाहीर झाला आहे. आवक वाढती आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) ४.७ टक्क्यांनी वाढून रु. ७,८०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ जाहीर झाला आहे; मुगाचा हंगाम आता संपला आहे.

Turmeric Market
NAFED Soybean Scam: तेराशे क्विंटल सोयाबीन खरेदीच्या खोट्या नोंदी

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) १.८ टक्क्यांनी घसरून रु. ४,१४१ वर आली होती. या सप्ताहात ती १.२ टक्क्यांनी वाढून रु. ४,१९२ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे. हमीभावापेक्षा बाजार भाव कमी आहे. भाव या वर्षी वाढण्याचा संभव कमी आहे.

तूर

गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) ०.८ टक्क्याने कमी होऊन रु. ७,५७९ वर आली होती. या सप्ताहात ती १.१ टक्क्याने वाढून रु. ७,६५९ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. आवक कमी होऊ लागली आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव बसवंत) किंमत या सप्ताहात या सप्ताहात रु. १,४८५ वर आली आहे. कांद्याची आवक टिकून आहे; रब्बीची आवक एप्रिल पासून सुरू होईल. कांद्याच्या किमतीवर लक्ष ठेवणे जरूर आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,००० वर आली होती; या सप्ताहात ती रु. ७५० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com