Chana Threshing : खानदेशात हरभरा मळणी पूर्णत्वाकडे

Chana Cultivation : खानदेशात पाऊसमान चांगले होते. यामुळे तिन्ही जिल्ह्यांत रब्बीची पेरणी अपेक्षेपेक्षा अधिक झाली.
Chana Harvesting
Chana Harvesting Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात पाऊसमान चांगले होते. यामुळे तिन्ही जिल्ह्यांत रब्बीची पेरणी अपेक्षेपेक्षा अधिक झाली. त्यात कोरडवाहू व बागायती हरभरा पिकाची मळणी जवळपास पूर्ण झाली आहे. काही भागात मोठ्या काबुली किंवा डॉलर हरभऱ्याची मळणी सुरू आहे.

रब्बी जोमात येईल. रब्बीचा पेरा १०० ते ११० टक्के होईल, असे चित्र सुरवातीलाच होते. खानदेशात हरभऱ्याची पेरणी यंदा ऑक्टोबरमध्ये सुरू झाली. क्षेत्र यंदा सुमारे १५ ते २० हजार हेक्टरने वाढले. काही भागात मोठ्या काबुलीची पेरणी जानेवारीतही झाली आहे.

हरभरा क्षेत्र एकूण दीड लाख हेक्टरवर होते. पण मका पिकापेक्षा हरभरा पेरणी कमी झाली होती. जळगाव जिल्ह्यात मक्याची एक लाख पाच हजार हेक्टरवर तर हरभऱ्याची पेरणी ९८ हजार हेक्टरवर झाली होती. कोरडवाहू हरभरा पिकही बऱ्यापैकी होते. त्याची सर्वप्रथम किंवा फेब्रुवारीतच मळणी झाली.

Chana Harvesting
Chana Harvesting : अकोल्यात हरभरा पीक काढणीला येऊ लागला वेग

चांगल्या ओलाव्याने कोरडवाहू क्षेत्र अधिक यंदा ओलावा चांगला होता. तसेच पाऊसमान चांगले राहिल्याने जलसाठे बऱ्यापैकी आहेत. यामुळे पेरणीला अनुकूल स्थिती होती. रब्बीत हरभरा पेरणीत मोठी वाढही झाली.

अनेकांनी सूक्ष्मसिंचनाच्या मदतीने मोठा काबुली, लहान काबुलीची पेरणी केली होती. सर्वच शेतकऱ्यांकडे मुबलक जलसाठे नसल्याने मका, ज्वारी ऐवजी हरभऱ्याची पेरणी झाली होती. यात अनेकांनी कोरडवाहू हरभरा पेरणी ऑक्टोबरमध्येच केली. ही पेरणी यंदाच्या हंगामात अधिक किंवा सुमारे ५० हजार हेक्टरवर झाली होती.

काही शेतकऱ्यांनी फक्त एकदाच पिकात सिंचन केले. खानदेशात केळी, पपई आदी पिकांसाठी हरभरा पिकांचे बेवड चांगले मानले जाते. यातूनही अनेकांनी जमिनीचा पोत, सुपीकता आदी बाबी लक्षात घेऊन हरभरा पेरणी केली होती. काबुली हरभऱ्याची पेरणी खानदेशात सुमारे ३० हजार हेक्टरवर झाली होती. यात मोठा काबुली किंवा डॉलर हरभऱ्याची पेरणी सुमारे १५ हजार हेक्टरवर झाली होती.

Chana Harvesting
Chana Harvesting : हरभरा काढणीच्या कामाला आला वेग

बेवडसह कमी खर्चाने लाभ

हरभरा कमी खर्च व कमी पाण्यात येणारे पीक आहे. यंदा पेरणीत किंचित किंवा १० ते १२ हजार हेक्टरने वाढ होईल, असे सांगितले जात होते. परंतु पेरणीत फारशी वाढ झाली नाही. कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी यंदा बऱ्यापैकी झाली होती. त्याची मळणीही पूर्ण झाली आहे. उडीद, मूग, सोयाबीनचे पीक आल्यानंतर त्यात हरभरा पेरणी झाली होती. काहींचे क्षेत्र नापेर होते. यामुळे आता हरभरा घेतल्यानंतर त्यात केळी, पपई, भाजीपाला पिकांची लागवड शेतकरी करीत आहेत.

काळ्या कसदार जमिनीत अधिकची पेरणी

हरभरा पेरणी खानदेशात जळगावमधील रावेर, यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात अधिक झाली होती. काळ्या कसदार जमिनीत अधिकची पेरणी झाली होती. कारण मध्यम, हलक्या जमिनीत हरभरा पीक हवे तसे येत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com