Agriculture Technology: संत्रा बागायतदारांना उपलब्ध होणार स्पेनचे वाण

Farmer Study Tour: नागपुरी संत्र्याच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी नाशिकच्या ‘सह्याद्री फार्म’ने स्पेनमधील वॅलेन्सिया संत्रा वाण आणि तंत्रज्ञान आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ३२ शेतकरी अभ्यासदौऱ्यावर असून, भविष्यात उच्च प्रतीची संत्रा शेती विकसित करण्याचा हा प्रयत्न आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: देशाअंतर्गत संत्रा फळांच्या गुणवत्ता सुधारात संशोधनात्मक पातळीवर गेल्या काही वर्षांत अपेक्षीत यश आले नाही. त्या पार्श्‍वभूमीवर स्पेनच्या वॅलेन्सिया भागातून वाण आणि तंत्रज्ञान आणण्यासाठी नाशिकच्या ‘सह्याद्री फार्म’कडून पुढाकार घेण्यात आला आहे. त्याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत ३२ शेतकरी आठवडाभराच्या स्पेन दौऱ्यावर आहेत.

राजे रघुजी भोसले हे दक्षिणेत स्वारीवर होते, त्या वेळी त्यांना एका राजाने संत्र्याची काही रोपे भेट दिली होती. नागपुरात परतल्यानंतर त्यांनी याची लागवड केली. या भागातील वातावरणात या झाडांपासून चांगल्या प्रतीची फळे मिळाली. चव आणि रंगाच्या बाबतीतही या फळांनी वेगळेपण जपले होते. त्यानंतरच्या काळात या संत्र्याच्या लागवड क्षेत्रात वाढ होत याला नागपुरी संत्रा अशी ओळख मिळाली, असे सांगितले जाते.

Nitin Gadkari
Orange Market: संत्र्याच्या दरात स्थिरता! मृगातील संत्रा ५० हजार रुपये टन दराने विक्रीत

आज राज्यात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर नागपुरी संत्रा लागवड असून त्यातील एक लाख हेक्‍टर क्षेत्र एकट्या अमरावतीत, २५ हजार हेक्टर नागपूर आणि उर्वरित २५ हजार हेक्‍टर हे राज्यात विस्तारले आहे. या फळात बियांचे प्रमाण अधिक असल्याने याचा प्रक्रियेकामी अपेक्षीत वापर होत नाही. बियांमुळे यात कडवटपणा वाढीस लागतो. त्यामुळे टेबलफ्रूट म्हणून याला मान्यता आहे.

साल पातळ असल्याने या फळाची टिकवणक्षमता देखील कमी आहे. या साऱ्याच्या परिणामी निर्यातीला देखील मर्यादा आहेत. त्यामुळे नव्या संत्रा वाणाचा पर्याय मिळावा, अशी मागणी संत्रा बागायतदारांमधून सातत्याने होत आहे. परंतु संशोधन संस्थास्तरावर नव्या वाणाचा पर्याय मिळू शकला नाही.

त्यामुळे संत्रापट्ट्यात गेल्या काही वर्षांत नैराश्‍य वाढीस लागले आहे. फळगळती तसेच प्रक्रिया उद्योगाचा अभाव असल्याने लहान आकाराच्या फळांची विल्हेवाट लावण्याचे आव्हान देखील बागायतदारांसमोर आहे. त्यातच कीडरोगग्रस्त रोपांचा पुरवठा होत असल्याने त्याचाही परिणाम उत्पादकतेवर होत अनेक शेतकऱ्यांवर बागा काढून टाकण्याची वेळ आली आहे.

Nitin Gadkari
Orange Market : हंगाम संपत आला तरीही संत्र्यांची आवक कायम

गडकरींसह शेतकरी अभ्यास दौऱ्यावर

स्पेनमधील वॅलेन्सिया प्रांत दर्जेदार संत्रा उत्पादनात आघाडीवर आहे. त्यामुळे या भागातील संत्रा वाण, व्यवस्थापन तंत्रज्ञान त्याबरोबरच प्रतवारी व इतर तांत्रीक बाबींची माहिती व्हावी याकरिता ‘सह्याद्री फार्म’कडून शेतकरी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. विलास शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कांचन गडकरी, राकेश मानकर, पुष्पक खापरे, ‘महाऑरेंज’चे संचालक श्रीधर ठाकरे, मनोज जवंजाळ यांच्यासह तब्बल ३२ शेतकरी यात सहभागी झाले आहेत. त्या भागातील तंत्रज्ञान उपलब्धतेसंदर्भात या वेळी स्पेनमधील काही खासगी व शासकीय संशोधन संस्थांशी सामंजस्य करारही करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

१४ वाणांची आयात

संशोधनात्मक पातळीवर संत्रा दर्जा सुधारात यश आले नाही. त्यामुळे नाशिकच्या सह्याद्री फार्मकडून गेल्या काही वर्षात विदेशातील तब्बल १४ लिंबुवर्गीय फळ वाणांची आयात करण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागांत याची लागवड करण्यात आली असून हे वाण लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याकरिता रोप निर्मिती होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com