Orange Market : हंगाम संपत आला तरीही संत्र्यांची आवक कायम

Nagpur Orange : नागपुरी संत्र्यांचा हंगाम संपल्यानंतर जानेवारी महिन्यापासून फळ बाजारात राजस्थान, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांतून संत्री येण्यास सुरुवात होत असते.
Orange
Orange MarketAgrowon
Published on
Updated on

Washi Market News : वाशीच्या एपीएमसी फळ बाजारात सध्या संत्र्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेला संत्र्यांचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे बाजारात आवक वाढली आहे. परिणामी, भावातही घसरण झाली आहे.

नागपुरी संत्र्यांचा हंगाम संपल्यानंतर जानेवारी महिन्यापासून फळ बाजारात राजस्थान, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांतून संत्री येण्यास सुरुवात होत असते. यंदा संत्र्यांचा हंगाम चांगला राहिला असून, आता अंतिम टप्प्यात आला आहे.

Orange
Orange Orchard : संत्रा फळबागांना विदेशी गुंतवणूकदारांची भेट

त्यामुळे शेतकरी आपला माल मोठ्या प्रमाणात फळ बाजारात पाठवत आहेत. परिणामी, आवक वाढल्याने भावही घसरले आहेत. मंगळवारी (ता. ४) रोजी एपीएमसीच्या फळ बाजारात ९,२८१ क्विंटल आवक झाली. ही महिनाभरातील मोठी आवक असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

Orange
Orange Damage Compensation : संत्रा गळ झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा

आवक वाढल्याने घाऊक बाजारातील भाव ४० ते ६० रुपयांवरून २५ ते ५० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. संत्र्यांच्या हा शेवटचा टप्पा असून, पुढील १५ ते २० दिवसच आवक होणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

संत्र्यांची आवक सध्या वाढली असून, महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणात संत्री बाजारात येत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन चांगले झाले असून, भाव मात्र काहीसे कमी झाले आहेत. सध्या हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने ग्राहकांना चांगल्या प्रतीची संत्री खाण्यासाठीची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनाही चांगला नफा कमवायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
- दिलशाद कुरेशी, व्यापारी, एपीएमसी फळ बाजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com