Farmers Study Tour
Farmers Study TourAgrowon

Farmers Study Tour : मुळशीतील शेतकऱ्यांचा सातारा, कोल्हापुरात अभ्यास दौरा

Organic Farming : मुळशी तालुक्यातील पाचशे शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आला होता. या वेळी सेंद्रिय शेती, देशी गाईंचा मुक्त गोठा, प्रगत विविध कार्यकारी सोसायटी यांचा अभ्यास शेतकऱ्यांनी केला.
Published on

Pune News : मुळशी तालुक्यातील पाचशे शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आला होता. या वेळी सेंद्रिय शेती, देशी गाईंचा मुक्त गोठा, प्रगत विविध कार्यकारी सोसायटी यांचा अभ्यास शेतकऱ्यांनी केला. या अभ्यासातून शेतीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न असल्याचे दौऱ्याचे आयोजन व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी सांगितले.

मुळशी तालुक्यातील ४६ विविध कार्यकारी संस्थांचे संचालक, कृषी व सहकाराशी संलग्न संबंधित सर्व कार्यकर्ते अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते. सोळशी (जि. सातारा) येथील प्रगतिशील शेतकरी जालिंदर सोळस्कर यांच्या अत्याधुनिक प्रकारच्या सेंद्रिय शेतीची या वेळी पाहणी करण्यात आली. मुंबई मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष व सदस्य बाळासाहेब सोळसकर यांनी शेतकऱ्यांना कमी क्षेत्रात आधिक उत्पादन घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

Farmers Study Tour
Organic Fertilizer : पारंपरिक सेंद्रिय खत शेतीला वरदान

तसेच येथील प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपली यशोगाथा सांगितली. त्यानंतर बी.व्ही.जी. ग्रुपच्या मेगा फूड पार्कची माहिती घेतली. सेंद्रिय शेतीमधून आलेल्या उत्पादनावर प्रक्रिया करून वेगवेगळ्या पदार्थांचे उत्पादन कसे घ्यायचे या प्रक्रियेची माहिती कंपनीचे अधिकारी रशी घाटे यांनी दिली.

Farmers Study Tour
Agriculture Disease : मित्र बुरशी ट्रायकोडर्मा

कन्हेरी (जि. कोल्हापूर) येथील सेंद्रिय शेती व एक हजार देशी गाईंच्या मुक्त गोठ्याची पाहणी केली. येथील प्रमुख प्रल्हाद जाधव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कसबा बावडा येथील श्रीराम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला भेट दिली. संस्थेचे सर्व व्यवसाय पाहण्यात आले.

या वेळी बँकेच्या संचालिका निर्मला जागडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक अंकुश उभे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, विजयराव ढमाले, रवींद्र चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष राजाभाऊ वाघ, विनायक ठोंबरे, शिवसेनेच्या पदाधिकारी स्वाती ढमाले, कांता, निता नागरे, शिल्पा ठोंबरे, श्रीकांत कदम, शेतकरी संघाचे पदाधिकारी राम गायकवाड, माऊली कांबळे, भाऊ केदारी, लक्ष्मण निकटे, काळूराम आखाडे, बंडू मेंगडे, हनुमंत सुर्वे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com