Soybean Market Rate : हंगाम संपल्यानंतर सोयाबीन, तूर दरात सुधारणा

Tur Market Rate : केंद्र सरकारने तुरीला ७५५० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र बाजारात हमीभावापेक्षा कमी दरानेच तुरीचे व्यवहार झाले. आता मात्र हंगाम अंतिम टप्प्यात असताना तुरीचे दरात सुधारणा नोंदविली गेली आहे.
Soybean Tur
Soybean Tur Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : हंगाम संपला असताना आता सोयाबीन सोबतच तूरीच्याही दरात वाढ नोंदविण्यात आली आहे. यापुढील काळात यात आणखी सुधारणांची शक्‍यता व्यापारी सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.

केंद्र सरकारने तुरीला ७५५० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र बाजारात हमीभावापेक्षा कमी दरानेच तुरीचे व्यवहार झाले. आता मात्र हंगाम अंतिम टप्प्यात असताना तुरीचे दरात सुधारणा नोंदविली गेली आहे. पाच एप्रिल रोजी तुरीचे दर ७२०० ते ७६०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर शनिवारी (ता. १९) तुरीला ६८०० ते ७३०० रुपयांचा दर मिळाला.

दरात सुधारणा होताच बाजारात देखील तुरीची आवक वाढली आहे. चार एप्रिल रोजी ८९८ क्‍विंटल इतकी अत्यल्प आवक होती. आता तुरीची आवक वाढत ३००० क्‍विंटलच्या पुढे गेली आहे. सोयाबीनच्या दरात देखील आता सुधारणा होत असल्याचे चित्र आहे. सोयाबीनला ४८९२ रुपयांचा हमीभाव जाहीर आहे. परंतु बाजारात संपूर्ण हंगाम ३८०० ते ४००० रुपयांनीच सोयाबीनचे व्यवहार झाले.

आता मात्र शेतकऱ्यांनी सोयाबीन विकल्यानंतर दर काहीसे वधारले आहेत. ४००० ते ४३६० रुपयांनी सोयाबीनचे व्यवहार होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. लुचई तांदूळाची आवक १९७ क्‍विंटल आणि दर ३००० ते ३२०० असा होता. सुगंधित वाण असलेल्या चिनोर तांदळाला ५६०० ते ६००० रुपयांचा दर मिळत आवक ४० क्‍विंटल झाली. परमल तांदळाची आवक १४५ क्‍विंटल तर दर ३५०० ते ३८०० असा होता. त्याचवेळी उडदाची आवक ११ क्‍विंटल होत दर ६३०० ते ६५०० रुपये असे होते.

Soybean Tur
Tur Procurement : तुरीचे दोन कोटी ३ लाख रुपयांवर चुकारे अदा

मुगाला ६००० ते ६८०० रुपयांचा दर मिळत आवक २४ क्‍विंटलची होती. भाजीबाजाराचा विचार करता वाल भाजीची आवक १० क्‍विंटल आणि दर ६००० ते ८००० रुपये होते. वांगी आवक ४०० क्‍विंटल तर दर १००० ते ८००० रुपये याप्रमाणे मिळत आहे. टोमॅटो आवकेमध्ये चढउतार होत असताना दर मात्र स्थिर असल्याचे चित्र आहे. टोमॅटो आवक गेल्या आठवड्यात ४०० ते ५५० क्‍विंटल होती.

Soybean Tur
Soybean Rate: सोयाबीनच्या भावात एका महिन्यात ३०० रुपयांपर्यंत सुधारणा

या आठवड्यात याची आवक ६०० ते ८०० क्‍विंटलवर पोहोचली आहे. टोमॅटोचे दर मात्र आता १२०० ते १७०० रुपयांवर आहेत. लाल मिरचीचे दर १०००० ते १३००० रुपयांवर स्थिरावले असून आवक २०८७ क्‍विंटलची झाली. पेरूचे दर २७००० ते ४६०० याप्रमाणे होते.

याची आवक मात्र अवघी चार क्‍विंटल नोंदविली गेली. बाजारात पालकाची आवक १०० क्‍विंटल होत याचे दर ८०० ते १००० रुपयांवर स्थिर आहेत. बटाटा आवक १७५० क्‍विंटल झाली. याचे दर १०० ते १८०० रुपयांवर स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

कलिंगड आवक मंदावली

कलिंगडाची आवक सुरुवातीला एक हजार क्‍विंटलच्या पुढे होती. या वेळी ३०० ते ७०० रुपये क्‍विंटल असा दर याला मिळत होता. आता आवक कमी होत ती ४५० क्‍विंटलवर आली आहे. त्यामुळे दरात अल्पशी सुधारणा होत ५०० ते ८०० रुपयांनी याचे व्यवहार झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com