
Nanded News : नांदेड : केंद्राच्या किमान हमी दरानुसार तूर विक्री करण्यासाठी जिल्ह्यात पणन महासंघाच्या २१ खरेदी केंद्रांवर केवळ ८८ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांकडे नोंदणीसाठी सात-बारावर तुरीचा पेरा नसल्यामुळे तूर बाजारात विकावी लागली. अशीच स्थिती व्हीसीएमएफ तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्राची असल्याची माहिती सूत्राने दिली.
जिल्ह्यात दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून बारा, विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन तसेच फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या या तीन यंत्रणेच्या माध्यमातून तूर खरेदी केंद्र सुरू आहेत. जिल्ह्यात ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंद असलेला सात-बारा, आधार कार्ड तसेच बँक पासबुकची झेरॉक्स घेऊन खरेदी केंद्रात नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
त्यानुसार दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या २१ खरेदी केंद्रावर केवळ ३०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यात किनवट ३०, गणेशपूर २०, हदगाव १०, मुक्रमाबाद ५३, जांब २१, रातोळी १८ अशी नोंदणी झाली आह तर व्हीसीएमएफ व शेतकरी उत्पादक कंपनीच्या केंद्रावरही तुरळक नोंदणी झाली.
पणनच्या १२ पैकी केवळ गणेशपूर १२ क्विंटल, तर वन्नाळी शहापूर येथे दोन अशा एकूण १४ शेतकऱ्यांची ८८.५० क्विंटल तूरीची खरेदी झाली आहे. यातील १४ शेतकऱ्यांना सहा लाख ६८ हजार १७५ रुपये अदा करण्यात आल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी दिली.
हरभरा खरेदी केंद्राकडेही शेतकऱ्यांची पाठ
जिल्ह्यात हरभरा खरेदीचीही पणनच्या १२ शासकीय खरेदी केंद्रावर ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकरी या खरेदी केंद्रावर नोंदणी करत आहेत. परंतु बाजारात सध्या हरभऱ्याला सरासरी दर हमी दराप्रमाणे मिळत असल्याने शेतकरी बाजारात हरभरा विक्री करण्याला प्राधान्य देत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.