Jaggery Market
Jaggery MarketAgrowon

Jaggery Price: श्रावणामुळे गुजरातमध्ये गुळाच्या मागणीत वाढ

Kolhapur Jaggery Market : श्रावणामुळे गुजरातेतून गुळाला चांगली मागणी येऊ लागल्याने गुळाच्या दरात गेल्या सप्ताहाच्या तुलनेत क्विंंटलला दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या गुळाला प्रतिक्विंटल ३९०० ते ४४०० रुपये इतका दर मिळत आहे.
Published on

Kolhapur News: श्रावणामुळे गुजरातेतून गुळाला चांगली मागणी येऊ लागल्याने गुळाच्या दरात गेल्या सप्ताहाच्या तुलनेत क्विंंटलला दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या गुळाला प्रतिक्विंटल ३९०० ते ४४०० रुपये इतका दर मिळत आहे. गुळाची एक दिवसाआड पाच ते सहा हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. एक किलोच्या रव्याला ४००० ते ४२२५ रुपये दर मिळत आहे.

श्रावण महिन्यात अनेक लोक उपवास करतात. उपवासाच्या काळात सात्विक आहाराला प्राधान्य दिले जाते, ज्यात गूळ एक महत्त्वाचा घटक असतो. अनेक गोड पदार्थ आणि पारंपरिक मिठाया गुळापासून बनवल्या जातात. यामुळे सध्या ग्राहकांबरोबरच मिठाई उद्योगातूनही गुळाला चांगली मागणी येत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. गुळाची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गुजरातमधून गुळाची दररोजची मागणी सुरू झाली आहे. विविध कार्यक्रम, उत्सव यामुळे गुळाला पसंती मिळत आहे.

Jaggery Market
Cotton Market : कापसाचे उत्पादन घटूनही भाव दबावात का?

बहुतांश व्यापारी कोल्हापूरबरोबरच कर्नाटकातूनही गूळ खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. श्रावणांमध्ये घरगुती पूजा व अन्य कार्यक्रमांमध्येही गुळाचा समावेश असलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात केले जातात. यामुळे मागणीत वाढ झाल्याचे चित्र गुजरातमधील बाजारपेठांमध्ये आहे. विशेष करून विविध प्रकारच्या लाडवांसाठी गुळाचा वापर वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.

Jaggery Market
Agrowon Podcast: मक्याचा दर स्थिर; गाजर- भेंडीचे दर टिकून, आले दरात सुधारणा तर उडदाचे दर कमी

आषाढापर्यंत मागणीत फारसे सातत्य नव्हते. गेल्या आठ दिवसांपासून मात्र दररोजची मागणी असल्याने बाजार समितीत येणारा गूळ काहीसा चढ्या भावाने विकला जात आहे. अलीकडे पावसाळी गुळाचा ट्रेंड सुरू झाल्याने बारमाही गूळ उपलब्ध होत आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून गुळाची बारमाही खरेदी होत असल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने गुळाच्या आवकेत कमी अधिकपणा आहे. गुऱ्हाळचालकांनी बंदीस्त गुऱ्हाळाचा वापर करून पावसाळ्यातही गूळ निर्मितीत सातत्य ठेवले आहे. सध्या नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडत असले तर अनेक गावांचे कोल्हापूरकडे येणारे पर्यायी मार्ग सुरू आहेत यामुळे गुळाची आवक विनाअडथळा सुरू असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

कोल्हापूर बाजार समितील दर्जानुसार गुळाचे दर. प्रतिक्विंटल रुपये

दर्जा किमान कमाल

१ ४४०० ४४४०

२ ४२०० ४३००

३ ४००० ४१९०

४ ३८०० ३९९०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com