Cotton : साठ गावांत ‘एक गाव एक वाण’

गेल्या वर्षीपासून नागपूरसह राज्यातील १२ जिल्ह्यांत कापूस मूल्यसाखळी विकास उपप्रकल्प (स्मार्ट कॉटन) राबविला जात आहे.
Cotton Rate
Cotton RateAgrowon
Published on
Updated on

नागपूर ः गेल्या वर्षीपासून नागपूरसह राज्यातील १२ जिल्ह्यांत कापूस मूल्यसाखळी विकास उपप्रकल्प (स्मार्ट कॉटन) (Smart Cotton) राबविला जात आहे. यात जिल्ह्यातील सावनेर, नागपूर, काटोल, नरखेड आणि हिंगणा तालुक्यांतील ६० गावांची निवड केली आहे. या गावांमध्ये ‘एक गाव-एक वाण’ ही संकल्पना (One Village One Verity) राबवली जात आहे.

Cotton Rate
Cotton : कापूस वायद्यांत का झाली सुधारणा?

या पाच तालुक्यांतील शेतकरी चार जिनिंगधारकांसोबत ‘महाकॉट’मार्फत (MahaCot) करार करणार आहे. यामध्ये काटोल, नरखेड, सावनेर व नागपूर - हिंगणा येथील जिनिंगचा समावेश आहे. या जिनिंगच्या १५ ते २० किलोमीटर परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी या प्रकल्पात सहभागी आहेत. हे शेतकरी जो कापूस पिकवतील त्यावर जिनिंगमध्ये प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर तयार होणाऱ्या कापसाची विक्री, मार्केटिंग ‘महाकॉट’ करणार आहे.

Cotton Rate
Cotton : कापूस बाजारात अचानक तेजी का आली ?

जिल्ह्यात यंदाच्या खरिपामध्ये कापसाचे सर्वाधिक २ लाख १३ हजार हेक्टरवर पेरा नियोजित होता. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्याच्या पाचही तालुक्यांतील सुमारे ६ हजारांवर शेतकरी या प्रकल्पात सहभागी झाले आहेत. गतवर्षी या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना कपाशीचे ‘अंकुर पी २७’ हे बियाणे लागवडीसाठी शंभर टक्के अनुदानावर दिले होते. यंदा त्यांना बियाण्याऐवजी कॉटन पिकिंग बॅग, इनफेक्टरी साइड, कॉटन स्टोरेज बॅग हे शंभर टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक गावाला शेतीशाळेसाठी ३२ हजार याप्रमाणे जिल्ह्यातील ६० गावांना तब्बल १९ लाख २० हजार रुपये देण्यात येणार आहे.

‘स्मार्ट कॉटन’ या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी मूल्यसाखळी विकास शाळा राबविण्यात येत आहे. बाजाराभिमुख पीक प्रात्याक्षिकेही घेण्यात येईल. प्रती एक एकराप्रमाणे ३० शेतकऱ्यांच्या शेतावर हे प्रात्याक्षिके आयोजित करण्यात येईल. तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत कापूस विक्री व्यवस्थापनाची पद्धत समाविष्ट सर्व घटकाच्या जबाबदाऱ्या याबद्दल प्रशिक्षण देण्यात येईल. हे प्रशिक्षण कपाशीच्या लागवडीपूर्वी व वेचणीपूर्वी देण्यात येणार आहे.

-अरविंद उपरीकर, नोडल अधिकारी, स्मार्ट प्रकल्प.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com