Cotton : कापूस वायद्यांत का झाली सुधारणा?

अमेरिकेत सध्या कापूस पिकाला दुष्काळाचा मोठा फटका बसतोय. पीक अंतिम टप्प्यात येतंय तसं दुष्काळाची दाहकता स्पष्ट होतेय.
Cotton Rate
Cotton RateAgrowon
Published on
Updated on

पुणेः अमेरिकेत कापसाच्या पिकाला दुष्काळाचा फटका (Cotton Crop Hit By Drought In America) बसतोय. अमेरिकेत यंदा कापूस उत्पादन (America Cotton Production) २८ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. भारतातही सततच्या पावसामुळे कापसाचं मोठं नुकसान (Cotton Crop Damage In India) होतंय. त्यामुळं कापूस दरताही (Cotton Rate) सुधारणा पाहायला मिळत आहे.

अमेरिकेत सध्या कापूस पिकाला दुष्काळाचा मोठा फटका बसतोय. पीक अंतिम टप्प्यात येतंय तसं दुष्काळाची दाहकता स्पष्ट होतेय. अमेरिकेतील टेक्सास राज्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तिथे कापूस उत्पादन ४० टक्क्याने घटण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं जुलै महिन्यातील अहवालात १९८ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. एक कापूस गाठ १७० किलोची असते.

Cotton Rate
Cotton : कापूस उत्पादकांसमोर आता किडींचे संकट

मात्र मागील महिनाभरात दुष्काळाचा कापूस पिकावरील परिणाम स्पष्ट जाणवतोय. त्यामुळं नुकत्याच प्रसिध्द केलेल्या अहवालात येथील उत्पादन १६० लाख गाठींवर स्थिरावण्याची शक्यता व्यक्त केलीये. म्हणजेच एकाच महिन्यात अमेरिकेतील उत्पादनाचा अंदाज ३८ लाख गाठींनी कमी करण्यात आला. मागील हंगामात अमेरिकेत २२४ लाख गाठी उत्पादन झालं होतं. म्हणजेच यंदा अमेरिकेचं कापूस उत्पादन ६४ लाख गाठींनी घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळं कापूस निर्यातही ३३ लाख गाठींनी कमी होऊन १५४ लाख गाठींवरच स्थिरावेल, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केलाय.

Cotton Rate
Cotton : जगभरातील कापूस पीक नैसर्गिक आपत्तीने संकटात

अमेरिकेतील कापूस उत्पादनघटीचा अंदाज आल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात सुधारणा झाली. न्यूयाॅर्क येथील इंटरकाॅंटीनेंटल एक्सचेंजवर डिसेंबरचे वायदे २ टक्क्यांनी सुधारुन ११६ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले. तर ऑक्टोबरचे वायदे जवळपास ३ टक्क्यांनी वाढले. ऑक्टोबरचे व्यवहार १२२.५८ सेंटने झाले.

युएसडीएनं यंदा भारतात गेल्या वर्षीपेक्षा जास्त उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केलाय. मात्र अमेरिकेप्रमाणेच भारतातही कापूस पिकाला सध्या संकटाचा सामना करावा लागतोय. केंद्र सरकारनं १२ ऑगस्टच्या पीक पेरणी अहवालात कापूस लागवडीचं क्षेत्र दिलेलं नाही. मात्र मागील आठवड्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार कापूस लागवड गेल्या वर्षीपेक्षा ६ टक्क्यांनी अधिक होती. मात्र महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये पिकाला पावसाचा मोठा तडाखा बसतोय. महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, हरियाना आणि पंजाबमध्ये पिकाचं नुकसान होतंय. त्यामुळं भारतात लागवड वाढली तरी उत्पादन वाढण्याची शक्यता दिसत नाही, असं जाणकारांनी सांगितलं.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात सुधारणा झाल्यानंतर देशातही कापसाचे दर वाढले. मंगळवारी कापसाचे वायदे २ टक्क्यांनी सुधारले. ऑगस्टचे वायदे ४८ हजार ५९० रुपये प्रतिगाठी या दराने पार पडले. विशेष म्हणजेच देशात ऑक्टोबर आणि नोव्हेबरच्या वायद्यांमध्येही सुधारणा झाली. या दोन्ही महिन्यांच्या वायदे दरात जवळपास ६ टक्क्यांनी सुधारणा झाली. ऑक्टोबरचे वायदे ३९ हजार ८३० रुपये तर नोव्हेंबरचे वायदे ३५ हजार २६० रुपये प्रतिगाठी दराने झाले.

अमेरिकेतील उत्पादनातील घटीचा अंदाज आणि भारतात पिकाला पावसाचा बसत असलेला फटका यामुळे दर सुधारलेत. येत्या काही दिवसांत दोन्ही देशांतील कापूस पिकाची नेमकी स्थिती लक्षात येईल. त्यावेळी कापूस बाजाराची पुढची दिशा अधिक स्पष्ट होईल, असं जाणकारांनी सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com